शाहरुख खानच्या 'या' अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली - क्लिनिकल डिप्रेशन शारीरिक आजारांप्रमाणेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 18:11 IST2023-08-31T18:04:20+5:302023-08-31T18:11:00+5:30

माहिरा खानने डिप्रेशन आणि मानसिक आरोग्य यांसारख्या गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा केली.

Pakistani actress Mahira Khan's shocking revelation; She said- Life changed after Uri attack | शाहरुख खानच्या 'या' अभिनेत्रीचा खुलासा; म्हणाली - क्लिनिकल डिप्रेशन शारीरिक आजारांप्रमाणेच

Mahira Khan

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पाकिस्तानात नाही, तर भारतातही जबरदस्त फॅन फॉलोवर्स आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.  आता ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये तिने डिप्रेशन आणि मानसिक आरोग्य यांसारख्या गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा केली आहे.

माहिरा खान 'FWhy Podcast' मध्ये मुलाखात दिली. येथे तिने खुलासा केला की  "प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात. दुःखाचा काळ आणि आनंदाचा काळ असतो. यश आणि अपयश असते. क्लिनिकल डिप्रेशन इतर कोणत्याही मानसिक आजार किंवा शारीरिक आजारांप्रमाणेच असते. आपण त्यावर त्याप्रमाणे उपचार केले पाहिजे", असे मत तिने मांडले आहे. 

 माहिरा  म्हणाली, मी बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त आहे. रणबीर कपूरसोबतचे स्मोकिंग फोटो व्हायरल झाल्यानंतर  नैराश्य आले होते . माझ्यासाठी तो कठीण काळ होता. माझ्यावर हल्ला झाला असे मला वाटत वाटले. एक वेळ अशी आली होती की माझा स्वतःवरचा विश्वास उडाला होता. मी एवढी तणावात होतो की पॅनिक अटॅक आला आणि मी बेशुद्ध पडले. मी पहिल्यांदाच थेरपीला गेलो होते. पण त्याचा काही फायदा झाला नाही, मी अनेक डॉक्टरांकडे गेले. ते वर्ष खूप कठीण होते. मला झोप येत नव्हती, हात थरथर कापत होते". अभिनेत्रीने सांगितले की, ती 6-7 वर्षांपासून औषधे घेत आहे. 

माहिरा खान म्हणाली, "मी रईस चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले होते आणि सर्व काही ठीक सुरू होते. त्यानंतर अचानक उरी हल्ला झाला. उरी हल्ल्यानंतर आयुष्यच बदलून गेलं.  राजकीय पातळीवर सर्व काही विस्कळीत झालं.  सततच्या मला ट्विटमध्ये, कॉलद्वारे धमक्या येत होत्या.  ते खूप भीतीदायक होते". 

माहिरा खान 2017 मध्ये शाहरुख खानसोबत रईस या चित्रपटात दिसली होती. माहिराने व्हीजे म्हणून करिअरची सुरुवात एमटीव्ही पाकिस्तानबरोबर केली होती. 2011 मध्ये बोल या पाकिस्तानी चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. फवाद खानसोबतच्या 'हमसफर' या टीव्ही शोने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

Web Title: Pakistani actress Mahira Khan's shocking revelation; She said- Life changed after Uri attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.