रॅपर बादशाहला डेट करतेय पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर, लग्नाबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 14:05 IST2024-11-13T14:04:21+5:302024-11-13T14:05:10+5:30

कोण आहे हानिया आमिर? वाचा...

Pakistani Actress Hania Aamir Dating Rapper Badshah reveals marriage plans | रॅपर बादशाहला डेट करतेय पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर, लग्नाबद्दल म्हणाली...

रॅपर बादशाहला डेट करतेय पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर, लग्नाबद्दल म्हणाली...

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Aamir) सध्या भारतातही चर्चेत आहे. 'कभी मै कभी तुम' या मालिकेतील तिची 'शरजिना' ही भूमिका पाकिस्तानसोबतच भारतातही लोकप्रिय झाली. हानिया वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. भारतीय रॅपर बादशाहला (Badshah) डेट करत असल्याची मध्यंतरी चर्चा रंगली. नुकतंच तिने एका मुलाखतीत लग्न कधी करणार याबद्दल खुलासा केला.

हानिया आमिर नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिला ती लवकरच लग्न करणार आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर हानिया सुरुवातीला हसली आणि म्हणाली, "सध्या लग्नाचा काही प्लॅन नाही. जेव्हा कधी मी लग्न करायचं ठरवेन तेव्हा मी नक्कीच ते खुलेपणाने सांगेन. लपवून ठेवणार नाही. सध्या मलाच माहित नाही मग काय सांगू. मी जगाला ओरडून सांगणारी मुलगी आहे सीक्रेट ठेवत नाही."

हानिया याआधी पाकिस्तानी गायक असीम अजहरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. सध्या ती रॅपर बादशाहला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर दोघांनीही आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं स्पष्ट केलं. 

हानिया केवळ २७ वर्षांची आहे. एवढ्या कमी वयात तिने खूप यश मिळवलं आहे. 'दिलरुबा', 'तितली', 'इश्किया', 'मुझे प्यार हुआ था' या पाकिस्तानी मालिकांमध्ये तिने काम केले आहे. सध्या ती पाकिस्तानातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Web Title: Pakistani Actress Hania Aamir Dating Rapper Badshah reveals marriage plans