पाकी अभिनेता अली जफरने ‘या’ गायिकेवर ठोकला १०० कोटींचा दावा! जाणून घ्या काय आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 16:04 IST2018-06-24T16:04:07+5:302018-06-24T16:04:07+5:30
अगदी अलीकडे पाकिस्तानी सिंगर व मॉडल मीशा शफीने पाकिस्तानी अभिनेता अली जफर याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर ...

पाकी अभिनेता अली जफरने ‘या’ गायिकेवर ठोकला १०० कोटींचा दावा! जाणून घ्या काय आहे कारण!!
अ दी अलीकडे पाकिस्तानी सिंगर व मॉडल मीशा शफीने पाकिस्तानी अभिनेता अली जफर याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर अन्य काही महिलांनीही अली जफरवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. आता या प्रकरणाला एक वेगळे वळण आले आहे. होय, अलीने मीशाविरोधात पाकिस्तानी चलनानुसार, १०० कोटी रूपयांचा मानहानी (भारतीय चलनानुसार, ६ कोटी रूपयांचा) दावा दाखल केला आहे. मीशाने सवंग लोकप्रीयता मिळवण्यासाठी माझ्यावर आरोप केलेत. यामुळे माझ्या प्रतीमेला धक्का पोहोचला, असे त्याने म्हटले आहे.
![]()
मीशाने सोशल मीडियावर अलीविरोधात मोहिम उघडली होती़. मी माझ्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात पहिल्यांदा बोलतेय. जेणेकरून अशा घटनांवरील समाजाची चुप्पी तोडली जाऊ शकेल. लैंगिक शोषणासारख्या घटनांवर उघडपणे बोलणे सोपे नसते. पण आता मला शांत राहणे अशक्य आहे. माझे मन मला आणखी शांत राहण्याची परवानगी देत नाहीये. मी एकदा नाही तर अनेकदा लैंगिक शोषणाची बळी ठरले. मी तरूण होते किंवा पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीत नवखी होते, तेव्हा नाही तर मी एक सशक्त स्त्री म्हणून ओळखली जात असताना, परखड बोलण्यासाठी, स्वतंत्र विचारांसाठी ओळखली जात असताना, दोन मुलांची आई असताना,अली जफरने माझे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर मला प्रचंड मानसिक त्रासातून जावे लागले. माज्या कुटुंबालाही मानसिक त्रास सहन करावा लागला. अलीसोबत मी काम केले आहे.स्टेजवर तो माझा सहकलाकार होता. पण त्याच्या वागण्याने मी हादरले. मी माझ्या या पोस्टद्वारे पाकिस्तानी मुलींना हेच सांगू इच्छिते की, शांत बसू नका. स्वत:वरच्या अशा अत्याचाराविरूद्ध आवाज उठवा, असे तिने म्हटले होते़
ALSO READ : ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने अली जफरवर लावला लैंगिक शोषणाचा आरोप!