पहेलाज निहलानी म्हणतात; मला काही फरक पडणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 18:38 IST2017-02-25T13:08:03+5:302017-02-25T18:38:03+5:30
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहेलाज निहलानी यांनी बॉलिवूड चित्रपट ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ला ‘असंस्कारी’ हा शब्द वापरला होता. यामुळे संपूर्ण ...

पहेलाज निहलानी म्हणतात; मला काही फरक पडणार नाही
स न्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहेलाज निहलानी यांनी बॉलिवूड चित्रपट ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ला ‘असंस्कारी’ हा शब्द वापरला होता. यामुळे संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या विरोधात उभे राहिले आहे. अनेकांनी त्यांनी निंदा केली. यावर पहेलाज निहलानी यांनी आपल्या पद्धतीने उत्तर दिले आहे. मला या पदावरून काढून टाकले तरी देखील मला कोणताच फरक पडणार नाही, मी आपले काम इमानदारीने करीत राहील.
पहेलाज निहलानी म्हणाले, भारतात निर्माण होणारे चित्रपट हे भारतीय संस्कृतीनुसार तयार व्हायला हवेत, चित्रपट महोत्सवात लोक प्रदर्शित करण्यात आलेले चित्रपट पाहून टाळ्या वाजवितात. मात्र थेअटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर हे चित्रपट पहायला कुणीच येत नाही. आम्ही या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या कंटेंटवरू न आक्षेप नोंदविला आहे. आम्हला बुर्का या शब्दावरून कोणताही आक्षेप नाही. आम्ही महिला सक्षमीकरणाच्या बाजुने आहोत मात्र महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखविण्याच्या विरोधात आहोत.
![]()
दरम्यान आॅल इंडिया मुस्लीम फेस्टिव्हल कमिटीने या चित्रपटाच्या विरोधात फतवा जारी केला आहे. कोंकना सेन शर्मा, रत्ना पाठक शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला अनेक चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’च्या प्रदर्शनाची तयारी करीत असलेल्या प्रकाश झा यांना सीबीएफसीने पत्र पाठवून या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ शकत नसल्याचे सांगितले होते. याची कारणेही त्यांनी दिली होती.
![]()
सेन्सॉर बोर्डाने बॅनचे कारण स्पष्ट करताना दिलेले दाखले खरोखरच धक्कादायक आहे. सेन्सॉर बोडार्ने म्हटले की, हा सिनेमा लेडी ओरिएंटेड असून, यामध्ये महिलांच्या लाइफपेक्षाही त्यांची फॅँटेसी दाखविण्यात आली आहे. त्याशिवाय सिनेमात सेक्शुअल सिन्सचा जबरदस्त भडीमार केलेला आहे. शिवीगाळ, अश्लील शब्द, आॅडिओ पोर्नोग्राफी आणि समाजाच्या एका कम्युनिटीविषयीचे काही सेन्सेटीव्ह प्रसंगही यात दाखविण्यात आले आहे.