‘पद्मावती’ला शाहीदचा रामराम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 16:54 IST2016-10-07T11:55:29+5:302016-10-08T16:54:25+5:30
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ला शाहीद कपूर रामराम ठोकणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंगचा अवाजवी हस्तक्षेप ...
.jpg)
‘पद्मावती’ला शाहीदचा रामराम!
पद्मावतीमध्ये रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांना जास्त वेटेज दिले जात असल्याचे सांगण्यात येते. भन्साळी शाहीदची भूमिका कमी करणार असल्याची देखील चर्चा आहे. आपला रोल कमी करण्यात येणार असल्याच्या चर्चेने शाहीद नाराज झाला असून त्याने हा चित्रपट सोडण्याचे ठरविले आहे. सोबतच शाहीदच्या या निर्णयाचे कारण स्क्रिन शेअरिंग मानले जात आहे. रणवीर सिंग यात अलाऊद्दीन खिलजीची भूमिका करणार असून शाहीद राजा रतन सिंग म्हणजेच पद्मावतीच्या पतीची भूमिका साकारणार आहे. दीपिका पादुकोन पद्मावतीच्या भूमिकेत दिसेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मावतीच्या पोस्टरमध्ये केवळ दीपिकाचाच समावेश असावा असा आग्रह रणवीरने धरला आहे. रणवीरच्या अशा वागण्याचा शाहीदला प्रचंड राग आला असून त्याने भन्साळी यांना रणवीरचा हस्तक्षेप तुम्ही थांबवू शकत नसला तर मला हा चित्रपट सोडावा लागेल असा दमही दिला आहे.
विशेष म्हणजे ‘पद्मावती’मध्ये शाहीद करीत असलेल्या भूमिकेला अनेक अभिनेत्यांनी नकार दिला होता. सुरुवातीला शाहीदने या भूमिकेला नकार दिला होता. मात्र नंतर तो या भूमिकेसाठी तयार झाला. यासाठी दीपिकाने मध्यस्ती केली होती असेही सांगण्यात येते.