‘पद्मावती’ टीमकडून झाले दुर्लक्ष ; सेटवर कामगाराला गमवावा लागला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 03:33 PM2016-12-28T15:33:27+5:302016-12-28T15:34:55+5:30

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटवर टीमकडून झालेल्या दुर्लक्षामुळे एका कामगाराला त्याचा जीव गमवावा लागला. स्थानिक कामगार ...

'Padmavati' team ignored; The worker lost the workforce! | ‘पद्मावती’ टीमकडून झाले दुर्लक्ष ; सेटवर कामगाराला गमवावा लागला जीव!

‘पद्मावती’ टीमकडून झाले दुर्लक्ष ; सेटवर कामगाराला गमवावा लागला जीव!

googlenewsNext
ग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटवर टीमकडून झालेल्या दुर्लक्षामुळे एका कामगाराला त्याचा जीव गमवावा लागला. स्थानिक कामगार संघटनेने केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा ‘पद्मावती’ ची टीम अडचणीत आलीये. मध्यंतरी, शाहिदने दीपिकासोबतच्या इंटिमेट सीन्सला दिलेल्या नकारामुळे भन्साळी विचारात पडले होते. आता पुन्हा चित्रीकरणाला ब्रेक देण्याची वेळ त्यांच्यावर येईल, असे दिसतेय. 

‘फिल्म स्टुडिओ सेटिंग’ आणि ‘एलिड मजदूर युनियन’ यांनी केलेल्या आरोपानुसार ‘पद्मावती’च्या टीमने सेटवर सुरक्षा साधनसामुग्री न बाळगल्याने कामगाराला जीव गमवावा लागला आहे. तो कामगार एक पेंटर होता. तो खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. युनियनने टीमवर आरोप केला की,‘ सेटवर कलाकारांच्या सुरक्षेसाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत पण सेटवर कामगार करणाºयांसाठी मात्र काहीही व्यवस्था नाही.’ युनियनतर्फे त्या कामगाराच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. 

युनियनचे जनरल सेक्रेटरी गंगेश्वरलाल श्रीवास्तव या घटनेविषयी बोलताना म्हणाले,‘मोठ्या प्रोडक्शन हाऊसचे निर्माते आणि दिग्दर्शक हे कामगारांची बिल्कुल काळजी घेत नाहीत. एखाद्या कलाकाराची जशी काळजी घेतली जाते तशी काळजी सेटवर कामगारांची घेतली जात नाही. सेटवर अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी कॅप, साधनसामुग्री हे सर्व असणं अपेक्षित आहे. या सर्व सुविधांचा फायदा सेटवर काम करणाऱ्या  कामगारांना घेणं गरजेचं असतं. पण, यातील कुठलीही सुविधा पद्मावतीच्या सेटवर नाही.’ दीपिकाने या घटनेबद्दल टिवटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. 

Web Title: 'Padmavati' team ignored; The worker lost the workforce!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.