सलमान खानच्या चित्रपटात या अभिनेत्रीने रिप्लेस केले पद्मावतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:43 IST2017-12-19T11:13:54+5:302017-12-19T16:43:54+5:30

सलमान खानच्या किक चित्रपटाचा  लवकरच सीक्वल तयार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्टारकास्टला घेऊन खूप चर्चा ...

Padmavati replaces this actress in Salman Khan's film | सलमान खानच्या चित्रपटात या अभिनेत्रीने रिप्लेस केले पद्मावतीला

सलमान खानच्या चित्रपटात या अभिनेत्रीने रिप्लेस केले पद्मावतीला

मान खानच्या किक चित्रपटाचा  लवकरच सीक्वल तयार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्टारकास्टला घेऊन खूप चर्चा आहे. आधी या चित्रपटात सलमानच्या अपोझिट दीपिका पादुकोण दिसणार होती. तर वरुण धवनचा कॅमिओची सुद्धा चर्चा होती. मात्र आता अशी माहिती मिळतेय की सलमान खानच्या अपोझिट दीपिका पादुकोणला रिप्लेस केले आहे. दिग्दर्शक साजिद नाडियादवालाने या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण केले आहे. किक-2 ची शूटिंग 2018 जून-जुलै महिन्यांत सुरु करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार यात आला सलमान सोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. किकमध्ये पण जॅकलिन मुख्य भूमिकेत दिसली होती.   

जॅकलिनच्या करिअरवर नजर टाकली तर तिला सीक्वेंसची क्वीन म्हटले जाऊ शकते. मर्डर-2, रेस-2, हाऊसफुल्ल-3 आणि जुडवा 2 मध्ये तिने काम केले आहे. सध्या ती रेस-3च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर ती किक-2च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या दोन्ही चित्रपट जॅकलिनसोबत सलमान खानच दिसणार आहे. 

किक-2 मध्ये डेजी शहा सुद्धा दिसणार आहे. किक २' ला घेऊन या चित्रपटाचे मेकर्स फारच उत्सुक आहे आहेत. कारण ह्यात सलमान खान आणि वरुण धवन दोघे पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे. साजिद नाडीयादवालाने २०१४ मध्ये चित्रपट किकच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि हा चित्रपट त्या वर्षातील सगळ्यात हिट चित्रपट ठरला.   या चित्रपटात सिद्धार्थच्या अपोझिट डेजी शाह आहे म्हणून त्यांना या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे समजते आहे. सिद्धार्थला या चित्रपटात त्याच्या अपोझिट एखादी टॉपची अभिनेत्री हवी होती. मात्रनंतर त्याला कळले या चित्रपटात त्याच्या अपोझिट डेजी शाह आहे मग त्यांना चित्रपटातून काढता पाय घेणेचे सोईस्कर समजले. सिद्धार्थने नकार दिल्यानंतर त्याच्या भूमिकेसाठी आदित्य रॉय कपूरला अप्रोच करण्यात आले होते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मग या भूमिकेसाठी बॉबी देओलचे नाव फायनल केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार आहे.

ALSO READ :  जॅकलिन फर्नांडिसच्या ‘या’ गोष्टीने वैतागला तैमूर अली खान! पाहा, व्हिडिओ!!

Web Title: Padmavati replaces this actress in Salman Khan's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.