Padmavati New Posters : सावधान...महारावल रतन सिंह पधार चुके है!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 10:10 IST2017-09-25T04:40:27+5:302017-09-25T10:10:27+5:30

 गत आठवड्यात आपण महाराणी पद्मावतीची झलक पाहिली. अर्थात ‘पद्मावती’ चित्रपटात महाराणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणा-या दीपिका पादुकोणचा लूक पाहिला. महाराणी ...

Padmavati New Posters: Careful ... Maharajal Ratan Singh has grown! | Padmavati New Posters : सावधान...महारावल रतन सिंह पधार चुके है!

Padmavati New Posters : सावधान...महारावल रतन सिंह पधार चुके है!

 
त आठवड्यात आपण महाराणी पद्मावतीची झलक पाहिली. अर्थात ‘पद्मावती’ चित्रपटात महाराणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणा-या दीपिका पादुकोणचा लूक पाहिला. महाराणी पद्मावतीच्या पाठोपाठ आता महारावल रतन सिंह अर्थात ही भूमिका साकारणा-या शाहिद कपूरचा लूकही रिलीज करण्यात आला आहे.
संजय लीला भन्साळींनी आज  महारावल रतन सिंह यांच्या रूपातील शाहिदचे दोन पोस्टर्स आज जारी केले. यात शाहिदच्या माथ्यावर लाल टिळा आहे. शाहिदच्या चेह-यावर एक वेगळेच तेज दिसतेय. दुस-या पोस्टरमध्ये त्याच्या हातात तलवार आहे. शिवाय त्याचे कपडे आणि माथे रक्ताने माखलेले आहे. 



शाहिद कपूर प्रथमच एका पीरियड ड्रामा चित्रपटात काम करतोय. यात तो राणी पद्मावतीचा पती अर्थात राजा रावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंह अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. आम्ही यापूर्वीच तुम्हाला सांगितले होते की, या चित्रपटात शाहिद कपूरचे सर्वाधिक शर्टलेस सीन्स असतील. हिरोला शर्टलेस करण्यात भन्साळी तसेही माहिर आहेत. आपल्या चित्रपटांत भन्साळींनी सलमान खानपासून रणवीर सिंहपर्यंत अनेकांना शर्टलेस केले आहे. 


 
ALSO READ : करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पद्मावती’च्या पोस्टरची केली होळी, निर्मात्यांना दिली धमकी!

शाहिद व दीपिकानंतर आला प्रेक्षकांना रणवीर सिंहच्या लूकची प्रतीक्षा आहे. राणी पद्मावतीचे किस्से आजही चित्तोडगडमध्ये ऐकवले जातात. आजही येथील लोकगीतांमध्ये महाराणी पद्मिनी उर्फ पद्मावती जिवंत आहे. महाराणी पद्मिनीला चित्तोडगडमध्ये देवीच्या रूपात पुजले जाते. दिल्लीचा सुल्तान अलाऊद्दीन खिल्जी याने चित्तोडगडचा राजा व पद्मावतीचा पती राजा रतन सिंह याला ठार केले आणि हळूहळू तो राज्यातील सर्व पुरूषांचा ठार मारत पुढे येतोय, हे ऐकताज राणी पद्मावतीने स्वत:ला अग्निकुंडात झोकून दिले होते. स्वत:ची आणि आपल्या प्रजेतील महिलांची अब्रू वाचवण्यासाठी तिने हे पाऊल उचलले होते. महाराणी पद्मावतीच्या या महान त्यागामुळे तिला संपूर्ण भारतात पुजले जाते. याच कारणामुळे भन्साळींनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ‘पद्मावती’चे पोस्टर जारी केले गेले आणि या पोस्टरवर अन्य कलाकारांऐवजी केवळ राणी पद्मावती अर्थात हे पात्र साकारणा-या दीपिकाला फोकस केले गेले होते. 
 

Web Title: Padmavati New Posters: Careful ... Maharajal Ratan Singh has grown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.