‘पॅडमॅन’ अक्षयकुमारचे पुन्हा दिसले देशप्रेम; शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दिले १२.९३ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 17:10 IST2018-01-20T11:38:30+5:302018-01-20T17:10:53+5:30
‘पॅडमॅन’ अक्षयकुमार याने पुन्हा एकदा आपली देशभक्ती दाखवून दिली आहे. त्याने शहिदांच्या कुटुंबीयांसाठी तब्बल १२.९३ कोटी रूपये दिले आहेत.

‘पॅडमॅन’ अक्षयकुमारचे पुन्हा दिसले देशप्रेम; शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दिले १२.९३ कोटी!
पत्रकार परिषद पार पडताच अक्षय मुंबईहून दिल्लीच्या दिशेने रवाना झाला. दिल्लीला तो ‘भारत के वीर’ हे देशभक्तीपर गीत लॉन्च करण्यासाठी गेला होता. परंतु याठिकाणी अक्षयचे पुन्हा एकदा वेगळेच रूप बघावयास मिळाले. त्याने पुन्हा एकदा आपल्यातील देशभक्ती दाखवून देताना शहीद जवानांच्या परिजनांसाठी तब्बल १२.९३ कोटी रूपयांची मदत केली. याविषयीची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी शेअर केली.
वास्तविक अक्षयने यापूर्वी शहिदांच्या कुटुंबीयांसाठी वेळोवेळी मदत दिली आहे. याच कारणामुळे अक्षयला संबंध देशातूून प्रचंड प्रेम मिळत आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरत असून, आगामी ‘पॅडमॅन’ही असाच करिश्मा दाखवेल अशी शक्यता आहे. दरम्यान, अक्षय सध्या त्याच्या ‘केसरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘गोल्ड’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे.