पी. व्ही. सिंधुच्या बायोपिकसाठी सोनू सूदची दीपिकाला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 16:37 IST2017-06-12T11:07:06+5:302017-06-12T16:37:06+5:30
फिल्म तूतक तूतक तूतिया तयार केल्यानंतर सोनू सूद बॅडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधु आपल्या होम प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटात ...

पी. व्ही. सिंधुच्या बायोपिकसाठी सोनू सूदची दीपिकाला पसंती
फ ल्म तूतक तूतक तूतिया तयार केल्यानंतर सोनू सूद बॅडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधु आपल्या होम प्रोडक्शनमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात सोनू दीपिका पादुकोणला घेऊ इच्छितो. दीपिका पादुकोण ही ज्येष्ठ खेळाडू प्रकाश पादुकोण यांची कन्या आहे. शालेय जीवनात दीपिका राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळायची. सिंधुने 2016 मध्ये झालेल्या ऑलिंम्पिकमध्ये भारताला रजत पदक मिळवून दिले होते. बॅडमिंटनमध्ये भारताला रजत पदक मिळवून देणारी सिंधु हि पहिली भारतीय महिला आहे. सिंधूच्या भूमिकेत दीपिकाला पाहणे निश्चितपणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
याआधी दीपिकाने सोनू सूदसोबत हॅप्पी न्यू इअर चित्रपटात एकत्र काम केले आहे. सिंधुवर बायोपिक तयार करण्यासाठी सोनू सतत पी.व्ही. सिंधु आणि तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. पुढील दोन महिन्यांत चित्रपटाची स्क्रिप्ट लिहुन तयार होईल. बॅडमिंटन पटू सायना नेहवालवरही चित्रपट तयार करण्यात येतोय ज्यात सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारते आहे. दोन्ही चित्रपटात एकच समानता आहे दोन्ही चित्रपट बॅडमिंटन पटूंच्या आयुष्यावर आधारित आहेत.
श्रद्धा कपूर तिच्या आगामी चित्रपट सायनाची भूमिका साकारण्यासाठी मेहनत घेतेय. प्रकाश पादुकोण यांच्या अॅकेडमीमध्ये जाऊन ती बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतेय. सायनाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी श्रद्धा उत्साहित आहे.
गेल्यावर्षीच सोनूने आपल्या शक्ती सागर प्रॉडक्शनची सुरुवात केली होती. शक्ती सागर प्रॉडक्शन सोनूच्या वडिलांच्या नावावर आहे. तुतक तुतक तुतिया’ हा सोनूच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट. सध्या दीपिका पद्मावतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती पद्मावती राणीची भूमिका साकारतेय. या चित्रपटात तिच्यासह रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.