Oscars 2022 nominations: 'जय भीम'नंतर 'मराक्कर'देखील ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 20:50 IST2022-02-08T20:46:36+5:302022-02-08T20:50:13+5:30
Oscar Awards 2022 :सूर्याचा 'जय भीम' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला. त्याच्याच पाठोपाठ मोहनलालचा 'मराक्कर' हा चित्रपटही या शर्यतीतून बाद झाला आहे.

Oscars 2022 nominations: 'जय भीम'नंतर 'मराक्कर'देखील ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
ऑस्कर २०२२ च्या नामांकनाची यादी अखेर जाहीर झाली आहे. लाईव्ह स्ट्रीमद्वारे करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांची घोषणा ट्रेसी एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन यांनी केली. यावेळी अभिनेता सूर्याचा 'जय भीम' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडला. त्याच्याच पाठोपाठ मोहनलालचा 'मराक्कर' हा चित्रपटही या शर्यतीतून बाद झाला आहे. या दोन्ही चित्रपटांकडून भारतीयांना प्रचंड अपेक्षा होती. मात्र, हे चित्रपट या शर्यतीत फार काळ टिकू शकले नाही.
'जय भी'म आणि 'मराक्कर' हे चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडले असेल तरी या शर्यतीत 'द पॉवर ऑफ द डॉग', 'बेसफास्ट' आणि 'द वेस्ट साइड स्टोरीज' या चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकन मिळालं आहे.
दरम्यान, 'जय भीम' आणि 'मराक्कर' या चित्रपटांना नामांकन मिळावं अशी असंख्य भारतीयांची इच्छा होती. मात्र, ऑस्करच्या शर्यतीमध्ये हे चित्रपट यशस्वी घोडदौड करु शकले नाही. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी २७ जानेवारीपासून मतदान सुरु झालं होतं. हे मतदान १ फेब्रुवारीपर्यंत सुरु होतं.