Oscar 2023 : ऑस्करच्या शर्यतीत आसामचा लघुपट 'मुर घुरार दुरोंतो गोति'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 19:21 IST2022-09-09T19:21:09+5:302022-09-09T19:21:42+5:30
एका विद्यार्थ्यानं प्रोजेक्टमध्ये एक शॉर्ट फिल्म बनवली आणि त्याला एका मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सर्वोत्कृष्ट फिल्म' पुरस्कार तर मिळालाच, पण ऑस्करच्या शर्यतीतही गेला.

Oscar 2023 : ऑस्करच्या शर्यतीत आसामचा लघुपट 'मुर घुरार दुरोंतो गोति'
एका विद्यार्थ्यानं प्रोजेक्टमध्ये एक शॉर्ट फिल्म बनवली आणि त्याला एका मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सर्वोत्कृष्ट फिल्म' पुरस्कार तर मिळालाच, पण ऑस्करच्या शर्यतीतही गेला. हे पूर्णपणे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. महर्षी तुहिन कश्यपचे हे स्वप्न साकार झाले आहे. कश्यपचा चित्रपट 'मुर घरर दुरांतो गोति- द हॉर्स फ्रॉम हेवन' हा लघुपट 'शॉर्ट फिल्म फिक्शन' श्रेणीत ऑस्कर २०२३ साठी पात्र ठरला आहे. २७ वर्षीय कश्यपने त्याचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असल्याचे म्हटले आहे.
कश्यपने सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SFRTI) साठी स्टुडंट प्रोजेक्ट म्हणून हा चित्रपट बनवला. या आसामी चित्रपटाला नुकताच बंगळुरू आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात (BISFF) 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' पुरस्कार मिळाला. 'मुर घुरार दुरंतो गोति'मध्ये आसाम लोकनृत्य ओज पालीसह एक हास्यास्पद विनोदाची सांगड घातली आहे आणि एका माणसाची कथा रेखाटण्यात आली आहे. ज्याला विश्वास आहे की त्याच्याकडे जगातील सर्वात वेगवान घोडा आहे जो शहरातील प्रत्येक शर्यत जिंकू शकतो. मात्र, प्रत्यक्षात त्याच्याकडे घोडा नसून गाढव असतो.
या चित्रपटात अभिनेता अतुल पाचानी मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत स्नेहनकर, अभिजित नाग, गौरव हलोई, राहुल धनगर, सोनातन कर्माकर आणि आशिष चॅटर्जी हे देखील चित्रपटात सहाय्यक भूमिकेत आहेत. 'मुर घुरार दुरांतो गोटी' चे क्रू बहुतेक SRFTI चे विद्यार्थी आहेत आणि त्याचे बहुतांश चित्रीकरण कॅम्पसमध्ये झाले आहे. चित्रपटाची काही दृश्ये कोलकात्याच्या बाहेरही शूट करण्यात आली आहेत. हे यापूर्वी मेक्सिको सिटीमधील चिनेटेका नॅशनल म्युझियम आणि कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखवण्यात आले होते.