Oscar 2018 : आॅस्करमध्ये पुन्हा दुमदुमणार ‘जय हो’, रहमानने शेअर केला फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 20:42 IST2018-03-04T15:11:52+5:302018-03-04T20:42:24+5:30
आॅस्कर विजेता ए. आर. रहमानचा पुन्हा एकदा आॅस्कर सोहळ्यात जलवा बघावयास मिळणार आहे, रहमाननेच त्याबाबतची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

Oscar 2018 : आॅस्करमध्ये पुन्हा दुमदुमणार ‘जय हो’, रहमानने शेअर केला फोटो!
आ स्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रहमानने पुन्हा एकदा आॅस्कर सेरेमनीमध्ये आपला जलवा दाखविण्यासाठी तयारी केली आहे. रहमानने स्वत:च याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्याचे झाले असे की, रहमानने हॉलिवूड संगीतकार हॅँस जीमरसोबतचा एक फोटो शेअर केला. त्याला कॅप्शन देताना लिहिले की, ‘कॅचिंग अप’ रिपोर्ट्सनुसार, आॅस्कर कॉन्सर्टमध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे गायिले जाणार आहे.
तुमच्या माहितीसाठी ए. आर. रहमानला ८१व्या अकॅडमी अवॉर्डमध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी दोन आॅस्कर पुरस्कार मिळाले होते. दरम्यान, हॉलिवूड संगीतकार हॅँस जीमर यांचे संगीत असलेल्या ‘डनर्किक’ या चित्रपटाला यंदाच्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी नॉमिनेशन मिळाले होते. शिवाय हॅँस जीमर या पुरस्काराचा प्रबळ दावेदार असल्याचेही बोलले जात आहे. अशात रहमानसोबतची जीमरची भेट अनेक अर्थांनी चर्चिली जात आहे.
दरम्यान, ९०व्या अकॅडमी अवॉर्ड सोहळ्यास अतिशय दिमाखदारपणे प्रारंभ झाला असून, कोणाच्या पदरात आॅस्कर पडतो याबाबतची कमालीची उत्सुकता लागली आहे. जगभरातील चाहते याबाबतची माहिती जाणून घेण्यास प्रचंड आतुर आहेत.