OSCAR 2017: दीपिका पदुकोन आॅस्करला जाणार का? जाणून घेण्यासाठी वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 14:14 IST2017-02-24T08:44:22+5:302017-02-24T14:14:22+5:30

हॉलीवूड चित्रपटातून जगभर ओळख मिळवल्यानंतर दीपिका पदुकोन प्रत्येक मोठ्या सोहळ्यात उपस्थित होती. तिच्या रेड कार्पेट लूक ची सगळीकडेच चर्चा ...

OSCAR 2017: Will Deepika Padukone go to Oscar? Read to learn ... | OSCAR 2017: दीपिका पदुकोन आॅस्करला जाणार का? जाणून घेण्यासाठी वाचा...

OSCAR 2017: दीपिका पदुकोन आॅस्करला जाणार का? जाणून घेण्यासाठी वाचा...

लीवूड चित्रपटातून जगभर ओळख मिळवल्यानंतर दीपिका पदुकोन प्रत्येक मोठ्या सोहळ्यात उपस्थित होती. तिच्या रेड कार्पेट लूक ची सगळीकडेच चर्चा होते. गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या आफ्टर पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर येत्या रविवारी होणाऱ्या आॅस्कर अवॉर्डमध्येही दीपिका हजेरी लावणार का याकडे सर्वांचे लक्ष होते.

मात्र तिच्या चाहत्यांसाठी निराशा करणारी बातमी आहे. आपली ‘डिप्पी गर्ल’ दीपिका आॅस्क रला जाणार नाही. तिने स्वत: याची माहिती दिली. मुंबईत एका कार्यक्रमात जेव्हा तिला आॅस्करला जाण्याबाबत विचारले असता ती म्हणाली की, ‘ही आयडिया तर फार छान आहे पण मी नाही जाणार.’

आता तिच्या न जाण्यामागे काय कारण असू शकते? यावर ती सांगते की, ‘मी सध्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. माझे सगळे वेळापत्रक आधीच तयार असल्यामुळे मला आॅस्करला जाण्यास वेळ नाही. पण मला नक्कीच या सोहळ्याला जायला आवडेल. फक्त या वर्षी ते शक्य नाही.’

ALSO READ: दीपिका पदुकोन करणार जस्टीन बीबरसोबत परफॉर्म?

दीपिकाला आॅस्करच्या रेड कार्पेटवर पाहण्यात आपल्या सर्वांनाच खूप आवडले असते. सध्या ती संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमाची शूटींग करीत आहे. तिच्यासोबत शाहिद क पूर आणि ‘बॉयफे्रंड’ रणवीर सिंग हेदेखील आहेत. मेवाड साम्राज्याची महाराणी पद्मावतीची भूमिका दीपिका साकारत आहे.

गेल्या महिन्यात ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झेंडर केज’ या चित्रपटातून दीपिकाचे हॉलीवूड पदार्पण झाले. विन डिझेलसोबत झळणाऱ्या दीपिकाच्या परफॉर्मन्सचे सर्वांनीचे कौतुक केले. प्रियांका चोप्रा पाठोपाठ आता दीपिकादेखील भारतीय कलाकार म्हणून जगभरात नाव कमावताना पाहुन सर्वांनाच तिचा अभिमान वाटतो.

ALSO READ: ​३०० रुपयांचा टॉप घालून पार्टीत पोहचली दीपिका पादुकोन!

Web Title: OSCAR 2017: Will Deepika Padukone go to Oscar? Read to learn ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.