OSCAR 2017: प्रियांका चोप्रा लावणार आॅस्करमध्ये चार चांद! ‘हा’ सेलिब्रेटी असणार तिच्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 11:25 IST2017-02-25T05:52:24+5:302017-02-25T11:25:28+5:30

येत्या रविवारी होणाऱ्या अकॅडमी अवॉर्ड्सला (आॅस्कर) प्रियांका जाणार असून तिने स्वत: इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली. विमानतळावरील धावपट्टीवरूनच तिने एक फोटो शेअर करून कळविले की ती आॅस्करला जाणार.

OSCAR 2017: Priyanka Chopra to launch four o'clock in Oscars! 'Ha' will be celebrity with her | OSCAR 2017: प्रियांका चोप्रा लावणार आॅस्करमध्ये चार चांद! ‘हा’ सेलिब्रेटी असणार तिच्यासोबत

OSCAR 2017: प्रियांका चोप्रा लावणार आॅस्करमध्ये चार चांद! ‘हा’ सेलिब्रेटी असणार तिच्यासोबत

पूर्ण जगाला उत्सुकता लागलेला आॅस्कर पुरस्कार सोहळा आता केवळ दोन दिवसांवर आलेला आहे. सिनेसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा अवॉर्ड शो म्हणून आॅस्करची ख्याती आहे. हॉलीवूडमधील उत्कृष्ट सिनेमांना पुरस्कृत करणाऱ्या या सोहळ्यात अनेक दिग्गज हजेरी लावतात. त्यामध्ये आपल्या ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचाही सहभाग असणार आहे.

येत्या रविवारी होणाऱ्या अकॅडमी अवॉर्ड्सला (आॅस्कर) प्रियांका जाणार असून तिने स्वत: इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली. विमानतळावरील थेट धावपट्टीवरूनच तिने एक फोटो शेअर करून कळविले की, माझा प्लॅन थोडास चेंज झाला आहे. आॅस्कर्स मी येतेय... ‘ला ला लँड’ चित्रपटाच्या विजयासाठी!



‘क्वांटिको’ या टीव्ही सिरीजनंतर प्रियांकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा दबदबा निर्माण केलेला आहे. सर्व मोठ्या सोहळ्यांना तिची उपस्थिती असते. मग ते एमी अवॉर्ड्स असो वा गोल्डन ग्लोब, रेड कार्पेटवर प्रियांका नेहमीच चर्चेचा विषय ठरते. त्यामुळे आता आॅस्कर रेड कार्पेटवर ती कोणता ड्रेस परिधान करणार याकडे चाहते आणि फॅशन जगताचे डोळे लागलेले आहे.

पण येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत एक व्यक्ती आहे जी प्रियांकासोबत आॅस्करला जातेय. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून महान संगीतकार मिक जॅगर आहेत. यावर्षी प्रचंड गाजलेला आणि अकॅडमी अवॉर्ड्समध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘ला ला लँड’ला समर्थन देण्यासाठी हे दोघे हजर राहणार आहेत.

जसे की आम्ही यापूर्वीच सांगितले आहे, दीपिका पदुकोण यंदाच्या आॅस्करला जाणार नाही. कामाच्या व्यस्ततेमुळे ती जाऊ शकणार नाही. पण आता प्रियांकाच्या उपस्थितीमुळे भारतीयांना आॅस्कर पाहण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. येत्या मे महिन्यात प्रियांका ‘बेवॉच’ सिनेमाद्वारे हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहे.

ALSO READ: ​दीपिका पदुकोन आॅस्करला जाणार का? जाणून घेण्यासाठी वाचा

Web Title: OSCAR 2017: Priyanka Chopra to launch four o'clock in Oscars! 'Ha' will be celebrity with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.