OSCAR 2017: दीपिका पदुकोणचा खोटारडेपणा उघडकीस; हा बघा पुरावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 12:13 IST2017-02-25T06:36:03+5:302017-02-25T12:13:10+5:30

कालच आम्ही तुम्हाला सांगितले की, दीपिका पदुकोण रविवारी होणाऱ्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला हजर राहणार नाही. स्वत: दीपिकाने मीडियाशी संवाद ...

OSCAR 2017: Deepika Padukone exposes falsehood; See this proof ... | OSCAR 2017: दीपिका पदुकोणचा खोटारडेपणा उघडकीस; हा बघा पुरावा...

OSCAR 2017: दीपिका पदुकोणचा खोटारडेपणा उघडकीस; हा बघा पुरावा...

लच आम्ही तुम्हाला सांगितले की, दीपिका पदुकोण रविवारी होणाऱ्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्याला हजर राहणार नाही. स्वत: दीपिकाने मीडियाशी संवाद साधताना म्हटले होते की, ती कामाच्या व्यस्ततेमुळे अकॅडमी अवॉर्ड्सला हजर राहू शकणार नाही. पण तिचे हे खोटे आता उघडकीस आले आहे.

मुख्य सोहळ्या आधी होणाऱ्या प्री-आॅस्कर कॉकटेल पार्टीला बॉलीवूडच्या या ‘मस्तानी’ने हजेरी लावून सर्वांनाच चकित केले. आधी ती म्हणते की, मी जाणार नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती आॅस्कर पार्टीला हजर होते. हे पाहून कोणालाच कळत नाहीए की, ती न जाण्याबाबत खोटे का बोलली?

‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ द झेंडर’ चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दीपिका आंतरराष्ट्रीय इव्हेंट्समध्ये आवर्जुन उपस्थित राहते. गेल्या महिन्यात गोल्डन ग्लोब आॅफ्टर पार्टीलाही ती गेली होती. त्यामुळे आॅस्कर सोहळ्यातही ती सहभागी होईल अशी सर्वांना अपेक्षा आणि इच्छा होती. मात्र, तिने तसा काही विचार नसल्याचे सांगितले होते.

¢¸f¸f¨f´ffa
दीपिका पदुकोण

परंतु प्री-आॅस्कर कॉकटेल पार्टीतील तिचे फोटो पाहून असे दिसतेय की, दीपिका सर्वांशी खोटे बोलून २७ फे ब्रुवारी रोजी आॅस्कर रेड कार्पेटवर चालणार आहे. प्री-आॅस्कर पार्टीत तिने काळ्या रंगाचा ‘रोलँड मौरेट’ वेल्वेटी ड्रेस घातलेला होता. आता ती या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसते हे काही वेगळे सांगायला नको. (निदान शाहिदच्या प्री-बर्थडे पार्टीतील दोन लाख रुपयांच्या त्या ड्रेसपेक्षा तर ती खूपच छान दिसतेय!)

तिकडे प्रियांकाने इन्स्टाग्रामवर जाहीर केले की, ती महान संगीतकार मिक जॅगर यांच्यासोबत आॅस्करला जाणार आहे. आता प्रियांका आणि दीपिकामधील स्पर्धा तर सर्वश्रुत आहे. त्यामुळे दीपिकाने आधी न जाण्याचा निर्णय बदलत हजर राहण्याचा तर निर्णय तर नसेल ना घेतला? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तत्पूर्वी प्री-आॅस्कर कॉकटेल पार्टीत सहभागी झालेले इतर हॉलीवूड सेलिब्रेटी पाहा -

Maryl
मेरिल स्ट्रीप

emma
एमा स्टोन

freida
फ्रीडा पिंटो

alicia
अ‍ॅलिशिया विकांडर

ALSO READ: प्रियांका चोप्रा लावणार आॅस्करमध्ये चार चांद!​

Web Title: OSCAR 2017: Deepika Padukone exposes falsehood; See this proof ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.