सारा अली खानसोबत झालं ओरीचं भांडण? स्वत:च खुलासा करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 20:03 IST2023-12-29T20:02:42+5:302023-12-29T20:03:52+5:30

ओरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Orry spoke on Sara Ali Khan and her friendship | सारा अली खानसोबत झालं ओरीचं भांडण? स्वत:च खुलासा करत म्हणाला...

सारा अली खानसोबत झालं ओरीचं भांडण? स्वत:च खुलासा करत म्हणाला...

ओरी उर्फ ओरहान अवतारमणि हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  कधी जान्हवी कपूर, कधी सारा अली खान आणि अनन्या पांडे, कधी नीशा देवगण, नीता अंबानी किंवा इतर मोठ्या फिल्म स्टार्ससोबत दिसतो. आता ओरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ओरीने सारा अली खानशी असलेल्या मैत्रीवर मोठा खुलासा केला आहे.  

ओरीने चाहत्यांसाठी नुकतंच 'आस्क मी एनीथिंग' म्हणजेच काहीही विचारा... असं सेशन घेतलं होतं. यावर  सारा अली खानशी तुझी मैत्री कशी आहे? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, 'एकेकाळी आम्ही खूप चांगले मित्र होतो. आमच्यात भांडण झालेलं नाही, पण आमची मैत्री पूर्वीसारखी राहिली नाही'.

पुढे तो म्हणाला, 'दोघांपैकी कोणीही एकाने फोन केला तर संभाषण होते. काही वर्षांपूर्वी मी परदेशात गेलो होतो, सारा तिच्या अभिनय कारकिर्दीमुळे भारतात होती. यादरम्यान आमच्यात काही अंतर आले. सारा आणि मी आता कमी बोलतो. पण एक काळ असा होता जेव्हा आम्ही खूप घट्ट मित्र होतो'. शिवाय, सारा एक उत्तम अभिनेत्री असल्याचेही तो म्हणाला. 

जान्हवी कपूर आणि न्यासा या ओरीच्या चांगल्या मैत्रीण आहेत. ओरी बिग बॉसमध्ये गेल्यावर जान्हवीने त्याच्यासाठी खास पोस्ट केली होती. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगनही अनेकदा ओरीसोबत पार्टी करताना दिसत आहे. नुकतेच  ओरीने लंडनमध्ये  जान्हवी कपूर आणि न्यासा देवगनसोबत व्हॅकेशनवर होता. याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. 

Web Title: Orry spoke on Sara Ali Khan and her friendship