किंग खानच्या 'झीरो'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 13:02 IST2018-12-19T13:01:08+5:302018-12-19T13:02:49+5:30
शाहरूखने 'कृपाण' धारण केल्याचं दृश्य #VFX द्वारे सुधारून घेतल्याची माहिती निर्मात्यांची उच्च न्यायालयात दिली आहे.

किंग खानच्या 'झीरो'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
मुंबई - किंग खानच्या 'झीरो' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. शाहरूखने 'कृपाण' धारण केल्याचं दृश्य #VFX द्वारे सुधारून घेतल्याची माहिती निर्मात्यांची उच्च न्यायालयात दिली आहे.
२१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार किंग खान शाहरुखचा चित्रपट झीरोच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अमृतपाल सिंग खालसा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने अर्धवट कपडे परिधान करून गळ्यात पैशाची माळ घालून 'कृपाण' धारण केल्याने शीख समुदाय नाराज असल्याने ते आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून हटविण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच झीरो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनातील अडथळे दूर झाले आहे.
नवी दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी झिरो या सिनेमाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये शाहरुखने अवहेलना करत कृपाणचा वापर केला आहे. कृपाण हे शीख धर्मियांमध्ये पवित्र मानले जात असून शीख धार्मिक ते धारण करतात. मात्र, या पोस्टरमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखविल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
मुंबई - किंग खानच्या 'झीरो' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा. शुक्रवारी होणाऱ्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 19, 2018