एक्स-गर्लफ्रेन्डच्या बहीणीने कपिल शर्माला लिहिले खुले पत्र! लिहिले, भेटायला ये पण नशेत येऊ नकोस!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 10:49 IST2018-04-12T05:19:03+5:302018-04-12T10:49:03+5:30
कॉमेडियन व टीव्ही सेलिब्रिटी कपिल शर्माचे ग्रह सध्या ठीक नाहीत, असेच म्हणायला हवे. अलीकडे कपिलने त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोस ...

एक्स-गर्लफ्रेन्डच्या बहीणीने कपिल शर्माला लिहिले खुले पत्र! लिहिले, भेटायला ये पण नशेत येऊ नकोस!!
क मेडियन व टीव्ही सेलिब्रिटी कपिल शर्माचे ग्रह सध्या ठीक नाहीत, असेच म्हणायला हवे. अलीकडे कपिलने त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोस व तिची बहीण नीति सिमोस या दोघींविरोधात एफआयआर दाखल केला. या दोघींनी आपली फसवणूक केल्याचा आरोप कपिलने आपल्या तक्रारीत केला आहे. पण आता प्रिती व नीतिने कपिलवर पलटवार केला आहे. होय, नीतिने कपिलला सोशल मीडियावर एक खुले पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे, यात नीतिने कपिलला ‘भैय्या’ संबोधले आहे.
![]()
ALSO READ : वाचा,कपिल शर्माच्या मानसिक स्थितीबद्दल काय बोलली एक्स- गर्लफ्रेन्ड प्रिती सिमोस !!
‘भैय्या, तुझ्या मदतीसाठी गेल्या वर्षभरापासून आम्ही किती प्रयत्न केलेत, हे तुला ठाऊक आहे. पण याबदल्यात तू आमच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. खरे तर आम्हीही तुझ्याच भाषेत याचे उत्तर देऊ शकलो असतो. आमची लीगल टीम तुझ्या व तुझ्या प्रवक्त्यांविरोधात मानहानीचा दावा करू शकली असती. पण ही गोष्ट तू पण जाणतो, की तुझे आमच्यावरचे आरोप खोटे आहेत. ना तुझ्याजवळ कुठला पुरावा आहे. गेल्या महिन्यात तूच आम्हाला अनेकदा कॉल केलेत आणि आमची मदत मागितली. आम्ही तुला परत येण्यासही म्हटले. यानंतर तू आमच्या घरी आलास. तुझी स्थिती पाहून आमचे अख्खे कुटुंब गहिवरले. यानंतर तू एक टीम म्हणून परत येणार होतास. सगळे काही ठीक करणार होतास. पण तू उलटून आमच्यावर आरोप केलेस. तू हे सगळे दारूच्या नशेत आणि लोकांच्या म्हणण्यावरून केलेस, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला तुझी काळजी आहे. मला तुझा भेटायचे आहे. तुझी मदत करायची आहे. पण आता मी ही मदत लीगल टीम, पोलिसांच्या उपस्थितीतचं करेल. आम्हाला भेटायला येताना दारूच्या नशेत येऊ नकोस, इतकेच,’ असे नीतिने आपल्या खुल्या पत्रात लिहिले आहे. आता कपिल या पत्रावर काय उत्तर देतो, ते बघूच.