Oo Antava Anupam Kher: 'हम आपके हैं कौन'च्या गाण्याला 'ऊ अंटावा'चा तडका; अनुपम खेर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; तुम्हीही पोट धरून हसत सुटाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 20:19 IST2022-02-04T20:18:07+5:302022-02-04T20:19:08+5:30

सोशल मीडियावरही धमाल व्हिडीओला मिळतेय तुफान पसंती

oo antava trending song Allu Arjun Pushpa Movie mixed with hum aapke hai koun watch anupam kher hilarious video going viral on social media | Oo Antava Anupam Kher: 'हम आपके हैं कौन'च्या गाण्याला 'ऊ अंटावा'चा तडका; अनुपम खेर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; तुम्हीही पोट धरून हसत सुटाल

Oo Antava Anupam Kher: 'हम आपके हैं कौन'च्या गाण्याला 'ऊ अंटावा'चा तडका; अनुपम खेर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; तुम्हीही पोट धरून हसत सुटाल

Oo Antava Anupam Kher Viral Video: डिसेंबर महिन्यात सुपरहिट झालेला साऊथस्टार अल्लू अर्जुनचापुष्पा हा चित्रपट नव्या वर्षातही लोकप्रिय ठरतंय. चित्रपटाची कथा, अभिनेते आणि संवाद लोकांना इतके आवडले की लहानमोठे सारेच त्या चित्रपटाचे चाहते झाले आहेत. आधी 'श्रीवल्ली' आणि आता 'ऊ अंटावा' सारखी गाणी लोक सहज गुणगुणताना दिसत आहेत. चाहते असोत की सेलिब्रिटी असोत, सगळेच आपापल्या स्टाईलमध्ये या चित्रपटाचे संवाद बोलताना दिसत आहेत. त्यामुळेच सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधित मीम्स आणि रिल्सचा पूर आला आहे. त्यातच आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता अनुपम खेर हे सोशल मीडियावर खूप अँक्टीव्ह असतात हे सर्वांनाच माहिती आहे. ते रोज काही ना काही पोस्ट करत असतात. त्यांच्या पोस्ट अनेक वेळा चर्चेचा विषय ठरतात. पण त्यांनी आज मात्र एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या 'हम आपके है कौन' या हिट चित्रपटातील आहे, ज्यामध्ये सलमान खान, माधुरी दीक्षित आणि रीमा लागू यांच्यासह अनेक सेलिब्रिटी 'आज हमारे दिल में...' हे गाणं गाताना दिसत आहेत. परंतु अनुपम खेर यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे तो व्हिडीओ एडिट केलेला आहे. 'पुष्पा' चित्रपटातील एका गाण्याचा तडका त्यांनी या व्हिडीओला लावला आहे.

या व्हिडिओमध्ये चित्रपटातील कलाकारांचे लिप-सिंकिंग ओ अंटावा या गाण्याला मॅच करणारे आहे. हा मजेशीर व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी कॅप्शन लिहिलं आहे, 'मी देखील ट्रेंडसोबत पुढे जातोय.' हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी भरपूर कमेंट्सही केल्या आहेत.

Web Title: oo antava trending song Allu Arjun Pushpa Movie mixed with hum aapke hai koun watch anupam kher hilarious video going viral on social media