अजय देवगणच्या 'मैदान'वर खास ऑफर! एकावर एक तिकिट फ्री; फक्त करा 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 17:44 IST2024-04-12T17:44:07+5:302024-04-12T17:44:23+5:30

अजय देवगणच्या मैदानवर एकावर एक तिकिट फ्री ही स्पेशल ऑफर आहे. कशी वापरायची यासाठी बातमी उघडा (maidaan, ajay devgn)

one plus one Special offer on Ajay Devgn Maidaan movie know the details | अजय देवगणच्या 'मैदान'वर खास ऑफर! एकावर एक तिकिट फ्री; फक्त करा 'ही' गोष्ट

अजय देवगणच्या 'मैदान'वर खास ऑफर! एकावर एक तिकिट फ्री; फक्त करा 'ही' गोष्ट

अजय देवगणच्या 'मैदान' सिनेमा सध्या खुप चर्चेत आहे. काल ११ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज झालाय. 'मैदान' सिनेमा गेल्या अनेक वर्षांपासून रिलीज होण्यासाठी रखडला होता. अखेर 'मैदान' सिनेमा अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रिलीज झालाय. 'मैदान' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत. अशातच 'मैदान' च्या टीमने प्रेक्षकांसाठी खास ऑफर ठेवली आहे.

'मैदान' सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासाठी सिनेमाच्या टीमने एक खास ऑफर ठेवली आहे. 'मैदान'च्या  टीमन एका तिकिटावर एक तिकिट फ्री अशी खास ऑफर प्रेक्षकांसाठी ठेवली आहे. यासाठी तुम्हाला बुक माय शो वर Maidaan हा कोड टाकायचा आहे. हा कोड टाकून अप्लाय केल्यास तुम्हाला एका तिकिटावर एक तिकिट फ्री मिळेल. या ऑफरचा कालावधी निश्चित नाही. तरीही लवकरात लवकर ही ऑफर संपूही शकते. त्यामुळे त्वरा करा. 

;मैदान'बद्दल सांगायचं तर,  फुटबॉल प्रशिक्षक सय्यद रहीम यांच्या संघर्षाची कथा सांगणारा 'मैदान' सिनेमाला गेल्या चार वर्षांपासून मुहुर्त मिळत नव्हता. अखेर ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा गुरूवारी प्रदर्शित करण्यात आला. अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 'मैदान'ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

 

Web Title: one plus one Special offer on Ajay Devgn Maidaan movie know the details