​‘शिवाय’चे एक नाही तीन ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 22:05 IST2016-07-03T16:22:25+5:302016-07-03T22:05:05+5:30

होय, ऐकता ते खरे आहे. अजय देवगण याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘शिवाय’च्या पोस्टर्सनी सगळ्यांचीच उत्सूकता वाढवली आहे. सोशल मीडियावरील ‘शिवाय’चे ...

One more trailer of 'Apartheid' | ​‘शिवाय’चे एक नाही तीन ट्रेलर!!

​‘शिवाय’चे एक नाही तीन ट्रेलर!!

य, ऐकता ते खरे आहे. अजय देवगण याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘शिवाय’च्या पोस्टर्सनी सगळ्यांचीच उत्सूकता वाढवली आहे. सोशल मीडियावरील ‘शिवाय’चे पोस्टर्स, स्टिल आणि अजयचे पोस्ट पाहून सगळेच या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. पण आता एक गुड न्यूज म्हणजे..‘शिवाय’चे एक नव्हे, दोन नव्हे तर एका पाठोपाठ एक असे तीन ट्रेलर येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ आॅगस्टला ‘शिवाय’चे पहिले ट्रेलर रिलीज होईल. यानंतर ९ आॅगस्टला दुसरे आणि १० आॅगस्टला तिसरे ट्रेलर जारी केले जाईल. आता तीन तीन ट्रेलर म्हटल्यानंतर प्रेक्षक जाम खूश आहेत. येत्या दिवाळीत करण जोहरचा ‘ये दिल है मुश्किल’व ‘शिवाय’ यांचा बॉक्सआॅफिसवर संघर्ष पाहायला मिळणार आहे. कदाचित तीन-तीन ट्रेलर याच लढाईच्या तयारीचा भाग असावेत!!

Web Title: One more trailer of 'Apartheid'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.