​चाहत्याने खरेदी केले एक लाख रुपयांचे तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 16:33 IST2017-01-14T16:33:23+5:302017-01-14T16:33:23+5:30

आपल्या आवडत्या अभिनेत्यांचे चित्रपट पाहता यावे यासाठी बहुतेक चाहते प्रयत्न करीत असतात. टॉलिवूडमध्ये तर अभिनेत्यांची जबरदस्त क्रेझ पहायला मिळते. ...

One lakh rupee ticket bought by fan | ​चाहत्याने खरेदी केले एक लाख रुपयांचे तिकीट

​चाहत्याने खरेदी केले एक लाख रुपयांचे तिकीट

ल्या आवडत्या अभिनेत्यांचे चित्रपट पाहता यावे यासाठी बहुतेक चाहते प्रयत्न करीत असतात. टॉलिवूडमध्ये तर अभिनेत्यांची जबरदस्त क्रेझ पहायला मिळते. नुकताच प्रदर्शित झालेल्या चिरंजीवीच्या चित्रपटासाठी काही कंपन्यांना सुटी देण्यात आल्याची बातमी चर्चेत असताना आता टॉलिवूडमधील सुपरस्टार बालाकृष्ण यांचा ‘गौतमीपुत्र शतकर्णी’ या चित्रपटाचे तिकीट एका चाहत्याने तब्बल एक लाख रुपयांत खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. 

गुरुवारी बालाकृष्ण याचा बहुचर्चित चित्रपट ‘गौतमीपुत्र शतकर्णी’ रिलीज करण्यात आला. हा बालाकृष्ण याचा १०० वा चित्रपट असून, यात अनेक दिग्गज कलावंतानी भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात बालकृष्ण याच्या आईची भूमिका ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी हिने तर पत्नीची भूमिका श्रीया सरन हिने साकारली आहे. याशिवाय कबीर बेदीची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी बालकृ ष्ण याच्या गोपीचंद ईन्नमूरी नामक चाहत्याने एक लाख रुपयांचे तिकीट खरेदी केले. गोपीचंद या चित्रपटाची तिकीट खरेदी करण्यासाठी मागील वर्षापासून पैसे गोळा करीत होता. यासाठी त्याने स्वत:चे काही खर्च देखील कमी केले होते असेही सांगितले आहे. 

south superstar nandamuri balakrishna fan pay one lakh for his film gautamiputra

गोपीचंद याने एक लाख रुपयाचे तिकीट खरेदी करण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण जाणल्यावर त्याच्या या खर्चकपातीची प्रशंसा कराल. बालाकृष्ण हे आपल्या चॅरिटी संस्थेच्या माध्यमातून इंडो-अमेरिकन कॅ न्सर हॉस्पिटल चालवितात. बालाकृष्ण याच्या चित्रपटाला होणारा नफा हा या हॉस्पिटलला दिला जातो. या चॅरिटी अंतर्गत बालाकृष्ण याने आपल्या चित्रपटाच्या पहिल्या तिकिटाची किंमत एक लाख रुपये ठेवली होती. कॅन्सर हॉस्पिटलला  व रुग्णांना उपचारात मदत मिळावी यासाठी गोपीचंदने एक लाख रुपयांचे तिकीट विकत घेतले आहे. 

या चाहत्याचा फोटो ट्विटरहून चित्रपटाच्या मार्केटिंग टीमने शेअर केला आहे. 

Bramarambha #GautamiPutraSatakarni Benefit show First Ticket Sold for 100,100/- (1 Lakh 1 Hundred) @vamsishekarPROpic.twitter.com/oHNAUorKih— Pavan Kumar (@paulpavan78) January 11, 2017 ">http://

}}}}

Web Title: One lakh rupee ticket bought by fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.