OMG ! प्रियंका चोप्राच्या बहिणीनं हॉटेलमधून मागवलेल्या जेवणात सापडल्या अळ्या, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 15:24 IST2019-08-26T15:23:46+5:302019-08-26T15:24:27+5:30
प्रियंका चोप्राची चुलत बहिण मीरा चोप्राने नुकताच एका पंचतारांकित हॉटेलचा बेजबाबदारपणा समोर आणला आहे. तिने हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या जेवणात अळ्या सापडल्या. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

OMG ! प्रियंका चोप्राच्या बहिणीनं हॉटेलमधून मागवलेल्या जेवणात सापडल्या अळ्या, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण
प्रियंका चोप्राची चुलत बहिण व अभिनेत्री मीरा चोप्रा हिला एका पंचतारांकित हॉटेलच्या बेजबाबदारपणाला सामोरं जावं लागलं. तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ पाहून हैराण व्हाल.
मीराने शेअर केलेला हा व्हिडिओ अहमदाबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमधला आहे. मीराने जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यात तिला अळ्या सापडल्या. प्लेटमध्ये अळ्या सापडल्यानंतर मीराने त्याचा व्हिडिओ बनविला व आपल्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट करीत त्या हॉटेलला चांगलेच खडेबोल सुनावले.
तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, मी या हॉटेलमध्ये थांबले आणि माझ्या जेवणात अळ्या सापडल्या. तुम्ही या हॉटेलला इतके पैसा देता आणि ते आपल्याला अळ्या खाऊ घालतात. हे खूप शॉकिंग आहे. आता हेल्थ सेफ्टी नियम कुठे गेले.
मीराने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यावर तिच्या चाहत्यांनी तिचं समर्थन केलं. तिने कमेंट करत लिहिलं की, तुम्हाला त्यांच्याविरोधात एफआईआर करायला पाहिजे. ते आपल्या स्वास्थ्यासोबत खेळत आहेत.
मीराच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं तर प्रियंका चोप्राची बहिण मीराने २०१६ साली दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतून तिच्या करियरला सुरूवात केली होती. आता ती आर्टिकल ३७५ मध्ये झळकणार आहे. तिच्यासोबत ऋचा चड्ढा व अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.