बाबो ! लग्नााधीच होणारा जावाई 'गे' असल्याचा होता संशय, तरीही लावून दिले मुलीचे लग्न, त्यानंतर जे काही घडले सगळ होत भन्नाट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 11:56 IST2020-07-24T11:55:38+5:302020-07-24T11:56:12+5:30

वैयक्तीक जीवनातही अक्षय कुमार एक उत्तम आणि आदर्श पती आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याचा सुखी संसार सुरु आहे.

OMG When Twinkle Khanna's Mother Felt Akshay Kumar Was A Gay | बाबो ! लग्नााधीच होणारा जावाई 'गे' असल्याचा होता संशय, तरीही लावून दिले मुलीचे लग्न, त्यानंतर जे काही घडले सगळ होत भन्नाट !

बाबो ! लग्नााधीच होणारा जावाई 'गे' असल्याचा होता संशय, तरीही लावून दिले मुलीचे लग्न, त्यानंतर जे काही घडले सगळ होत भन्नाट !

अभिनेता अक्षय कुमारला बॉलीवुडचा खिलाडी नंबर वन असं म्हटलं जातं. त्याचा अभिनय, कॉमेडीचं टायमिंग यासह त्यांच्या स्टंट्सचे सारेच फॅन आहेत. एक हरहुन्नरी अभिनेता असण्यासोबतच अक्की एक आदर्श पती आणि आदर्श पिताही आहे. त्याच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीचं कलेक्शन केलं आहे. आपल्या कमाईपेक्षाही आपल्या कामाने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैयक्तीक जीवनातही अक्षय एक उत्तम आणि आदर्श पती आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याचा सुखी संसार सुरु आहे.

दोघांचंही एकमेंकांवर जीवापाड प्रेम आहे. मात्र दोघांचं हे नातं निर्माण होण्याआधी त्याला अक्षय कुमारची सासू आणि प्रसिद्ध अभिनेत्री  डिंपल कपाडिया यांनी विरोध केला होता. या विरोधाचं कारण ऐकून  तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या कारणाचा खुलासा खुद्द अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने केला आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकलचे एकमेंकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही लग्नाच्या तयारीत होते. ही बाब ट्विंकलने आपली आई डिंपलला सांगितली.

मात्र डिंपलचा या लग्नाला सुरुवातीला विरोध होता. अक्षय कुमार गे अर्थात समलैंगिक असल्याचा डिंपलला संशय होता. ट्विंकलने आपल्या आईला म्हणजेच डिंपलला बरंच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र डिंपल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ही सगळी बाब ट्विंकलच्या वडिलांना म्हणजेच सुपरस्टार राजेश खन्ना यांनी समजली. या सगळ्या तिढ्यात त्यांनी मधस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावर तोडगा म्हणून राजेश खन्ना यांनी अक्षय आणि ट्विंकल यांना लग्नाआधी वर्षभर एकत्र राहण्याचा सल्ला दिला.

 

यानंतर अक्षय आणि ट्विंकल वर्षभर एकत्र राहिले. त्यानंतर डिंपलला खात्री पटली की अक्षय कुमार गे नाही आणि लेकीचं लग्न त्यांनी खिलाडी कुमारशी मोठ्या आनंदात लावून दिलं. 

Web Title: OMG When Twinkle Khanna's Mother Felt Akshay Kumar Was A Gay