एक तरफ है घरवाली एक तरफ बाहरवाली, जेव्हा एकाच फोटोत दिसल्या धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 14:59 IST2021-10-16T14:52:08+5:302021-10-16T14:59:40+5:30

1954 मध्ये त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले.तर 2 मे 1980 रोजी धर्मेंद्रने हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले.

OMG: ​when Dharmendra's both wife Prakash kaur And Hema Malini were captured in one frame | एक तरफ है घरवाली एक तरफ बाहरवाली, जेव्हा एकाच फोटोत दिसल्या धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी

एक तरफ है घरवाली एक तरफ बाहरवाली, जेव्हा एकाच फोटोत दिसल्या धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी

ॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये झळकलेल्या ड्रीमगर्ल हेमा मालिनी 73 वर्षांच्या झाल्या आहेत. 16 ऑक्टोबर 1948 रोजी चेन्नईजवळ अम्मानकुडी येथे जन्मलेल्या हेमा यांचे जगाच्या कानाकोप-यात चाहता वर्ग आहे. त्यांचे फिल्मी करिअर जितके गाजले तितकेच त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत राहिले. हेमा यांची चर्चा जास्त झाली जेव्हा त्यांनी जगाची पर्वा न करता धर्मेंद्र यांच्यासह लग्नबंधनात अडकल्या. हेमा या धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी बनल्या. हेमासोबत लग्न केले तेव्हा धर्मेद्र आधीच विवाहीत होते. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच एक जुना फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामुळे हेमा आणि धर्मेंद्र यांचे लग्नही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोत  धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी दोघेही एकत्र दिसत आहेत.फोटोमध्ये हेमा प्रकाश कौर याच्या शेजारीच  उभे राहून पोज देत आहेत. एका कार्यक्रमातला हा फोटो आहे,ज्यात अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.

लग्नापूर्वी हेमा प्रकाश कौर यांना समारंभात अनेक वेळा भेटल्या आहेत. पण लग्नानंतर प्रकाश कौर आणि हेमा या भेटल्या नाहीत.हेमा यांनी सांगितले होते की,मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता. धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे केले त्याबद्दल मी आनंदी आहे. त्यांनी वडिलांची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न वयाच्या १९ व्या वर्षी झाले. 1954 मध्ये त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले. या लग्नापासून त्यांना चार मुले आहेत अजय सिंह अर्थात सनी देओल, विजय सिंह म्हणजेच बॉबी देओल आणि दोन मुली विजता, अजिता.


2 मे 1980 रोजी धर्मेंद्रने हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले. या लग्नापासून  ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत .ईशाने सिनेमांमध्ये काम केले आहे आणि सध्या ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आ.हे आणि सिनेमांपासून दूर जात आपले वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. तर अहानाने कधीही सिनेमांमध्ये काम करण्याचा विचार केला नाही. ती एक उत्तम शास्त्रीय नृत्यांगना आहे

 

Web Title: OMG: ​when Dharmendra's both wife Prakash kaur And Hema Malini were captured in one frame