OMG......श्रद्धा हे काय बोलून गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 16:05 IST2016-06-14T10:35:04+5:302016-06-14T16:05:04+5:30
श्रद्धा कपूरला कुणाबरोबर तरी लाँग ड्राईव्हला जायचंय. कुणाबरोबर तिला वेळ घालवायचाय.काही निवांत क्षणांचा आनंद तिला घ्यायचाय. ही व्यक्ती दुसरी ...

OMG......श्रद्धा हे काय बोलून गेली
श रद्धा कपूरला कुणाबरोबर तरी लाँग ड्राईव्हला जायचंय. कुणाबरोबर तिला वेळ घालवायचाय.काही निवांत क्षणांचा आनंद तिला घ्यायचाय. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेता फरहान अख्तर आहे.. खुद्द श्रद्धानंच एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत विधान केलंय. कोणत्या अभिनेत्यासोबत लाँग ड्राईव्हला जायला आवडेल विचारलं असता श्रद्धानं बेधडकपणे आपलं उत्तर दिलं फरहान.फरहानकडून भाग मिल्खा भाग सिनेमातील मिल्खा सिंग कसा साकारला हे जाणून घ्यायचंय. याचं उत्तर ब-याच काळापासून फरहानकडून अपेक्षित आहे.. मात्र तो काही उत्तर देत नाही.. कदाचित लाँग ड्राईव्हला निवांत क्षणी याचं उत्तर मिळेल असं श्रद्धानं म्हटलंय. आता तुम्हीच सांगा लाँग ड्राईव्हला जाऊन निवांत क्षण घालवण्यासाठी कुणी तरी स्पेशल व्यक्ती लागते.. कदाचित फरहान श्रद्धासाठी खूप स्पेशल आहे. त्यामुळं दोघांमध्ये नक्कीच काही तरी गुंटरगू सुरु आहे.