OMG : ‘या’ गोष्टींमुळे विद्या बालनचा ‘बेगम जान’ ठरेल सर्वांपेक्षा वेगळा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 13:24 IST2017-04-14T07:54:30+5:302017-04-14T13:24:30+5:30
या चित्रपटात अशा काही गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत ज्यामुळे हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा ठरणार आहे.

OMG : ‘या’ गोष्टींमुळे विद्या बालनचा ‘बेगम जान’ ठरेल सर्वांपेक्षा वेगळा !
‘कहानी २’ मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानंतर विद्या बालन पुन्हा स्क्रीनवर आपला जलवा दाखविण्यासाठी तयार झाली आहे. आज विद्या बालनचा ‘बेगम जान’ हा चित्रपट रिलीज होत असून त्यात तिचा असा अंदाज दिसणार आहे जो दर्शकांनी आजपर्यंत कधीही पाहिला नसेल. शिवाय या चित्रपटात अशा काही गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत ज्यामुळे हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा वेगळा ठरणार आहे.

हा चित्रपट श्रीजीत मुखर्जीचा बंगाली चित्रपट ‘राजकाहिनी’चा हिंदी रिमेक आहे, ज्याला नॅशनल अॅवार्डदेखील मिळाला होता.
चित्रपटाची कथा १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान विभागणीनंतर बंगाल प्रांताची आहे. चित्रपटाच्या पृष्ठभूमिमध्ये कोठ्यावर राहणाºया ११ महिला आहेत. विभागणीनंतर जेव्हा नवी हद्द बनते तेव्हा नेमका कोठ्याचा अर्धा भाग भारतात येतो आणि अर्धा भाग पाकिस्तानात येतो.
चित्रपटात विद्या बालनने या कोठ्याच्या मालकिनीची भूमिका साकारली आहे. मूळ चित्रपटात मात्र ही भूमिका रितुपर्णा सेनगुप्ताने साकारली होती आणि यासाठी तिला दिल्ली आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरुस्कार मिळाला आहे.
या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विद्या बालन एका चारपायीवर बसून हुक्का पिताना दिसत आहे, तिचा हा फर्स्ट लूक सोशल मीडियावरही खूपच व्हायरल झाला होता. विद्याचा हा अंदाज आतापर्यंत कोणत्याच चित्रपटात पाहावयास मिळालेला नाही. असा अंदाज लावला जात आहे की, ‘द डर्टी पिक्चर’ सारखाच हा चित्रपट विद्याच्या करिअरला यशाच्या शिखरावर नेईल.
चित्रपटात गौहर खानदेखील आहे जी वेश्याच्या भूमिकेत दिसेल. भूमिका नैसर्गिक वाटण्यासाठी गौहर खानने कुठलाच मेकअप केला नाही आणि चेहऱ्याच्या काळजीसाठी कोणत्याही वस्तूंचा वापर केला नाही.