OMG ! सनी लिओनी बनली जलपरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 21:00 IST2019-01-23T21:00:00+5:302019-01-23T21:00:00+5:30
अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या बहारदार डान्सने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आगामी चित्रपटातील एका खास गाण्यात जलपरीच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

OMG ! सनी लिओनी बनली जलपरी
अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या बहारदार डान्सने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आगामी चित्रपटातील एका खास गाण्यात जलपरीच्या रुपात पाहायला मिळणार आहे. ऋषी कपूर, सनी सिंग आणि ओमकार कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या झूठा कहीं का या चित्रपटातील एका गाण्यात सनी दिसणार आहे.
झूठा कहीं का या चित्रपटातील या खास गाण्याचे चित्रीकरण थायलंडमध्ये करण्यात आले आहे. सनी आणि ओमकार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला हनी सिंगने स्वरसाज दिला आहे. हनी सिंगने या गाण्यात प्रसिद्ध बडबडगीत ‘मछली जल की रानी है’ या ओळींचाही समावेश केला आहे. गाण्याच्या बोलनुसार सनी यामध्ये मत्स्यकन्येच्या रुपात दिसणार असून तिच्यासाठी खास तसे कपडे तयार करण्यात आले आहेत.
या गाण्याबद्दल सनी लिओनी म्हणाली की, हनी सिंगची प्रत्येक गाणी लोकांच्या पसंतीस पडतात. हे गाणेसुद्धा चाहत्यांना आवडेल अशी खात्री आहे. मत्स्यकन्या साकारणे हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता. माझ्या या नव्या लूकविषयी चाहत्यांना काय वाटते हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता आहे.
‘झूठा कहीं का’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्मीप कांग करत असून यामध्ये जिमी शेरगीलचीही भूमिका आहे. ८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सनीला मत्सकन्येच्या रुपात पाहणे कमालीचे ठरणार आहे.