OMG !! ‘बेपर्वा’ सनी लिओनीची पुन्हा एक ‘हॉट’ जाहिरात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 12:05 IST2017-03-05T08:37:16+5:302017-03-07T12:05:26+5:30
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिची कंडोमची एक जाहिरात अलीकडे चांगलीच चर्चेत आली होती. या जाहिरातीवर बंदी लादण्याची मागणी करत, गोव्यातील एक संघटना रस्त्यावर उतरली होती. पण कदाचित सनीवर याचा काहीच फरक पडलेला नाही. होय, कारण सनीची आणखी एक नवी, हॉट कंडोम जाहिरात नुकतीच लॉन्च करण्यात आलीय. सोशल मीडियावर सध्या याच जाहिरातीची चर्चा आहे.

OMG !! ‘बेपर्वा’ सनी लिओनीची पुन्हा एक ‘हॉट’ जाहिरात!
प र्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिची कंडोमची एक जाहिरात अलीकडे चांगलीच चर्चेत आली होती. या जाहिरातीवर बंदी लादण्याची मागणी करत, गोव्यातील एक संघटना रस्त्यावर उतरली होती. पण कदाचित सनीवर याचा काहीच फरक पडलेला नाही. होय, कारण सनीची आणखी एक नवी, हॉट कंडोम जाहिरात नुकतीच लॉन्च करण्यात आलीय. सोशल मीडियावर सध्या याच जाहिरातीची चर्चा आहे. सनी यात अतिशय बोल्ड रूपात दिसतेय. गोव्यात सनीच्या अशाच एका हॉट जाहिरातीवरून रान माजले असताना तिची आणखी एक हॉट जाहिरात याची, याचे अनेकांना आश्चर्य वाटतेय. पण बिनधास्त सनी कदाचित याबद्दल कमालीची बेपर्वा दिसतेय.
गोव्यात हिंदू जनजागृती समितीची महिला शाखा रणरागिनीने सनीची कंडोमची वादग्रस्त जाहिरात हटवण्याची मागणी केली होती. कंडोम व गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातींमध्ये महिलांना वस्तू म्हणून प्रदर्शित केले जाते. सार्वजनिक स्थळांवर प्रदर्शित या जाहिरातींमुळे महिलांना लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, असे रणरागिनी या संघटनेचे म्हटले होते. यासंदर्भात आम्हाला अनेक महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच आधारावर या जाहिराती हटविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत असल्याचा दावाही या संघटनेने केला होता. सनी लिओनीची संबंधित कंडोम जाहिरात हटवण्यात यावी, अशी मागणी याआधीही झाली आहे. काही दिवसांपूर्वी सीपीआय नेते अतुल कुमार अंजान यांनी सनीच्या कंडोम जाहिरातीवर आक्षेपार्ह विधान केले होते. अर्थात त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर त्यांनी याबद्दल जाहिर माफी मागितली होती. सनीच्या कंडोम जाहिरातीमुळे अश्लिलता वाढत आहे. सनीची अॅडल्ट मुव्ही बघून मी ओकारी केली होती, असे विधान त्यांनी केले होते.