OMG!सुहाना खानने चक्क कॅटरिना कैफच्या ड्रेसची केली कॉपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 12:06 IST2017-06-23T06:36:18+5:302017-06-23T12:06:18+5:30
सध्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान या दोघींच्या नावाप्रमाणे आणखी एका स्टारकिडसची बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार असल्याची जोरदार चर्चा ...

OMG!सुहाना खानने चक्क कॅटरिना कैफच्या ड्रेसची केली कॉपी
स ्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान या दोघींच्या नावाप्रमाणे आणखी एका स्टारकिडसची बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ती स्टार किड म्हणजे किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान. सध्या फक्त याच कारणावरून नाही तर वेगवेगळ्या कारणांमुळे सुहाना चर्चेत आली आहे. ते ही तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे. काही दिवसांपूर्वीच गौरी खाननं डिझाईन केलेल्या रेस्टॉरन्ट लॉन्चच्या वेळी सुहानाचा अंदाज पाहून कॅमे-यांसह उपस्थितांचीही नजर तिच्यावरुन हटत नव्हती. सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रीया देताना दिसले. अर्थात नेटीझन्सने सुहानाच्या ड्रेसिंग स्टाईलवरच प्रतिक्रीया देताना दिसतात. त्यामुळे सुहानाची चर्चा थांबता थांबत नाहीय.आता आणखी एक फोटोमुळे सुहानाही कॉपी कॅट असल्याचेही बोलले जात आहे. कॅटरिना कैफने एका कार्यक्रमात सुहानाप्रमाणेच ऑरेंज कलरचा वनपिस घातला होता.कॅटरिनाचा हा फोटो पाहताच सुहाना कॅटरिनाची फॅशन फॉलो करत असल्याचे बोलले जात आहे.लॉन्चिंगवेळी सुहानाने घातलेला ड्रेस हा कॅटरिनाच्या ड्रेसची कॉपी केल्याचे म्हटले जात आहे.विशेष म्हणजे सुहानाने घातलेला ड्रेसच्या किंमतीही चर्चा होत आहे. या ड्रेसची किंमत जवळपास 60,000रू.इतकी असल्याचेही माहिती मिळतेय.त्यामुळे बॉलिवूड पदार्पणापूर्वीच सुहाना प्रकाशझोतात आली आहे.बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून बादशाहची लेक रुपेरी पडद्यावर अवतणार असल्याचं बोललं जातंय. किंग खान शाहरुखनं त्याचा खास मित्र करणला यासाठी विशेष गळ घातली असून लाडक्या लेकीसाठी खास स्क्रीप्ट तयार करण्यास सांगितल्याचं बोललं जातंय.सुहानाच्या रक्तातच अभिनय असल्यामुळे आपल्या वडिलांप्रमाणेच सुहानाही बॉलीवुड गाजवेल अशा बॉलिवूडकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपेल मत मांडले आहे.
![]()