OMG! शमिता शेट्टीने अंडरगारमेंट्स न घातल्यामुळे झाली होती तिची फजिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 15:05 IST2017-02-02T09:35:38+5:302017-02-02T15:05:38+5:30
शमिता शेट्टीने मोहोब्बते या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. शमिता ही शिल्पा शेट्टीची लहान बहीण असल्याने तिच्यासाठी बॉलिवूडमध्ये एंट्री ...

OMG! शमिता शेट्टीने अंडरगारमेंट्स न घातल्यामुळे झाली होती तिची फजिती
श िता शेट्टीने मोहोब्बते या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. शमिता ही शिल्पा शेट्टीची लहान बहीण असल्याने तिच्यासाठी बॉलिवूडमध्ये एंट्री करणे सोपे होते. पण तिच्या बहिणीप्रमाणे तिला बॉलिवूडमध्ये जम बसवता आला नाही. शमिता तिच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा कॉन्ट्रव्हर्सींसाठीच चर्चेत राहिली. तिने नुकतेच 38व्या वर्षांत पदार्पण केले आहे. जाणून घेऊया शमिताविषयी काही गोष्टी
शमिता शेट्टी एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच ओळखली जाते. तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना मोहोब्बते या तिच्या पहिल्याच चित्रपटात पाहायला मिळाला होता. त्यानंतर अनेक चित्रपटात ती बोल्ड अवतारात झळकली.
![bold shamita shetty]()
काही वर्षांपूर्वी एका इव्हेंटमध्ये तिने कपड्यांच्या आत अंडरगारमेंट्स घातले नव्हते. याची प्रचंड चर्चा मीडियात झाली होती. कारण त्या इव्हेंटच्यावेळी ती खुर्चीत बसलेली असताना ते स्पष्टपणे लक्षात येत होते. त्यावेळी फोटोग्राफर्सनी तिचे काढलेले फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
![shamita shetty]()
शमिता ही प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहीण असून तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला आयफाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता.
![shamita shetty movie]()
शमिता ही तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली. मनोज वाजपेयीसोबत तिचे अफेअर असल्याची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच आफताब शिवदासानी, हरमन बावेजा. उपेन पटेल अशा अभिनेत्यांसोबतदेखील तिचे नाव जोडले गेले होते.
![shamita shetty affairs]()
शमिता एक अभिनेत्री म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकली नसल्याने तिने एक आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मेरे यार की शादी है या चित्रपटातील शरारा-शरारा आणि साथिया या चित्रपटातील चोरी पे चोरी ही गाणे वगळता तिच्या कोणत्याही गाण्याला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही.
![shamita Shetty in sharara sharara]()
शमिताने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. तसेच तिची बहीण शिल्पा शेट्टीने बिग ब्रदर या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवल्यानंतर तीदेखील बिग बॉसमध्ये झळकली होती. पण काही कारणांनी तिला बिग बॉसचे घर सोडावे लागले होते. तसेच झलक दिखला जा या कार्यक्रमात तिने तिचे नृत्यकौशल्य दाखवले होते. बॉलिवूड, छोटा पडदा या सगळ्या माध्यमातून अपयश मिळवल्यानंतर शमिताने अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आता ती इंटिरियर डिझायनर म्हणून स्वतःचे करियर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
![bold shamita Shetty]()