OMG : शाहिद कपूरकडे ‘पद्मावती’शिवाय एकही चित्रपट नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 19:37 IST2017-07-23T14:07:41+5:302017-07-23T19:37:41+5:30
नुकत्याच पार पडलेल्या ‘आयफा २०१७’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अभिनेता शाहिद कपूर याच्याकडे ‘पद्मावती’ या चित्रपटाशिवाय ...
OMG : शाहिद कपूरकडे ‘पद्मावती’शिवाय एकही चित्रपट नाही!!
न कत्याच पार पडलेल्या ‘आयफा २०१७’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अभिनेता शाहिद कपूर याच्याकडे ‘पद्मावती’ या चित्रपटाशिवाय दुसरा चित्रपटच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वास्तविक शाहिदकडे इंडस्ट्रीतील नेक्स्ट सुपरस्टार म्हणून बघितले जाते. त्याची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर असतात. तरुणींमध्ये तर तो कमालीचा लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याला बॉलिवूडचा दुसरा शाहरूख खानही म्हटले जाते. असे वलय असलेल्या एखाद्या अभिनेत्याच्या हाताला काम नाही असे म्हटले तर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु शाहिदबाबत ही वस्तुस्थिती आहे. ‘पद्मावती’ हा चित्रपट सोडल्यास त्याच्याकडे एकही चित्रपट नाही.
शाहिदच्या चाहत्यांसाठी तर ही धक्कादायक बातमी आहे. विशेष म्हणजे याबाबतचा खुलासा खुद्द शाहिद कपूरनेच केला आहे. पीटीआयला मुलाखत देताना शाहिदने म्हटले की, ‘सध्या मी पद्मावतीच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच प्रोजेक्ट नाही; मात्र मी याबाबतची चिंता करीत नाही’ असेही शाहिदने म्हटले आहे. शाहिदचे हे वक्तव्य जरी परिपक्व अभिनेत्याप्रमाणे असले तरी, चिंतादायकही आहे. कारण शाहिदसारख्या अभिनेत्याच्या हाताला काम मिळत नसेल तर इंडस्ट्रीमधील स्पर्धा किती टोकाची होत आहे, हेही तेवढेच खरे म्हणावे लागले.
![]()
पुढे बोलताना शाहिदने म्हटले की, ‘तुम्ही जर एखाद्या चांगल्या चित्रपटाची प्रतीक्षा करीत असाल तर त्यात वावगे वाटून घेण्यासारखे काहीच नाही. मी असे चित्रपट करू इच्छितो ज्याचा विषय चांगला आहे. शिवाय ते इंटरटेनिंग असावेत. शाहिदने त्याच्या आगामी ‘पद्मावती’विषयी बोलताना म्हटले की, मला या चित्रपटाविषयी बोलण्याची परवानगी नाही. मी फक्त एवढेच सांगेल की, चित्रपटाची संपूर्ण कास्ट खूपच मजेदार आहे. या चित्रपटातून लोकांना कमालीचे व्हिज्युअल्स बघावयास मिळणार आहेत. मी या चित्रपटात काम करताना खूप एन्जॉय करीत आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.
काही दिवसांपासून असे वृत्त येत आहे की, संजय लीला भन्साळी शाहिदच्या कामापासून खूपच इम्प्रेस आहे. ते त्याच्या आगामी ‘ट्यूजडे अॅण्ड फ्रायडे’ या चित्रपटातही शाहिदचा विचार करीत आहेत. हा चित्रपट एक हलका-फुलका कॉमेडीपट असणार आहे. याविषयी जेव्हा शाहिदला विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, ‘मीदेखील असेच काही वाचले आहे. परंतु अद्यापर्यंत चित्रपट साइन केलेला नाही. याबाबतच्या आॅफिशियल घोषणेसाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.’