OMG!! सारा अली खानने ‘रिपीट’ केला पापाच्या रिसेप्शनमधला ड्रेस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 10:42 IST2017-10-16T05:12:20+5:302017-10-16T10:42:20+5:30
सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी दिवाली पार्टीत बिझी आहेत. अर्पिता खान, शाहरूख खान, अक्षय कुमार यांच्यानंतर डिझाईनर अबू जानी आणि संदीप ...
.jpg)
OMG!! सारा अली खानने ‘रिपीट’ केला पापाच्या रिसेप्शनमधला ड्रेस!
स ्या बॉलिवूड सेलिब्रिटी दिवाली पार्टीत बिझी आहेत. अर्पिता खान, शाहरूख खान, अक्षय कुमार यांच्यानंतर डिझाईनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनीही दिवाळी पार्टीचे आयोजन केले. अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन नंदा, नव्या नवेली नंदा असे अनेक स्टार या पार्टीला पोहोचले. पण यात सगळ्यांचे लक्ष गेले ते सैफ अली खान व अमृता सिंहची मुलगी सारा अली खान हिच्यावर. अर्थात कारणही तसेच होते.
अनारकली सूटमध्ये सारा या पार्टीला पोहोचली. तिचा हा अनारकली ड्रेसच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. या अनारकली ड्रेसमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत होती, यात वाद नाही. पण अनेकांना तिचा हा अनारकली ड्रेस खटकला. का? कारण साराचा हा अनारकली ‘रिपीट’ होता.
![]()
![]()
ALSO READ: ‘केदारनाथ’मध्ये अशा सिंपल लूकमध्ये दिसणार सैफची मुलगी सारा अली खान!
आता ‘रिपीट’ म्हणजे नेमके काय कदाचित तुम्हाला कळणार नाही. तर, हा ड्रेस साराने दुसºयांदा कॅरी केला होता. २०१२ मध्ये पापा सैफ अली खान व करिना कपूर या दोघांच्या रिसेप्शनमध्ये सारा याच अनारकलीमध्ये दिसली होती. संदीप खोसला यांच्या इथल्या पार्टीतही सारा याच ड्रेसमध्ये दिसली. फरक इतकाच की, १०१२ पेक्षा आता २०१७ मध्ये सारा अधिक फिट झाली. आता तुम्ही म्हणाल ड्रेस रिपीट करण्यात काय इतक, आम्ही तर रोजच ड्रेस रिपीट करतो. सामान्यांचे चालते हो, पण सेलिब्रिटींच्या दुनियेत कपडे ‘रिपीट’ हा भलताच चर्चेचा विषय ठरतो. साराच्या बाबतीतही नेमके हेच घडलेय.
लवकरच सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करते आहे. सुशांत सिंग राजपूत हा साराचा हिरो आहे. या चित्रपटाच्या शूटींगचे पहिले शेड्यूल संपले. मध्यंतरी सारा या चित्रपटाच्या सेटवर बरेच नखरे दाखवू लागल्याची बातमी आली होती. साराच्या नखºयांमुळे चित्रपटाचा संपूर्ण क्रू वैतागला असल्याचे यात म्हटले गेले होते. ड्रेस आणि मेकअपबद्दल जरा जास्तच सिलेक्टिव्ह असल्यामुळे शूटींगचा वेळोवेळी खोळंबा होत असल्याचेही या बातमी म्हटले गेले होते. अर्थात नंतर मेकर्सनी ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते.