​OMG! सलमानच्या ‘सुल्तान’साठी आधी ठरले होते ‘दंगल’ हे नाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 19:33 IST2016-06-01T14:03:13+5:302016-06-01T19:33:13+5:30

होय, हे खरे आहे. योगायोगाने  सलमान खान अभिनीत ‘सुल्तान’ आणि आमीर खान अभिनीत ‘दंगल’ हे दोन्ही सिनेमे डिसेंबरमध्येच रिलीज ...

OMG! Salman's 'Sultan' was the name of 'Dangal'. | ​OMG! सलमानच्या ‘सुल्तान’साठी आधी ठरले होते ‘दंगल’ हे नाव!!

​OMG! सलमानच्या ‘सुल्तान’साठी आधी ठरले होते ‘दंगल’ हे नाव!!

य, हे खरे आहे. योगायोगाने  सलमान खान अभिनीत ‘सुल्तान’ आणि आमीर खान अभिनीत ‘दंगल’ हे दोन्ही सिनेमे डिसेंबरमध्येच रिलीज होत आहेत. दोन्ही सिनेमे पहेलवानाच्या आयुष्यावर बेतलेले आहेत. एवढे कमी की काय, म्हणून ‘सुल्तान’साठी सर्वप्रथम ‘दंगल’ हेच नाव ठरले होते, असे आता समोर आले आहे. होय, ‘सुल्तान’चा पहिला ड्राफ्ट तयार झाला तेव्हा त्याला ‘दंगल’ हेच नाव देण्यात आले होते. एका आॅनलाईन पोर्टलने हा दावा केला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. हरियाणात कुस्तीच्या खेळाला स्थानिक भाषेत ‘दंगल’ म्हणतात. त्यामुळे ‘सुल्तान’चा पहिला ड्राफ्ट तयार झाला तेव्हा तो ‘दंगल’याच नावानेच. मात्र नंतर काही बदलानंतर या चित्रपटासाठी ‘सुल्तान’ हे नाव फायनल करण्यात आले. सलमानच्या पर्सनॅलिटीला ‘सुल्तान’हे टायटल एकदम मॅच होत असल्याने जफर आता जाम खूश आहेत. जफर यांनी २०१२ मध्ये आदित्य चोपडा यांना चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट पाठवला. मात्र याचदरम्यान आमीर खानही पहेलवानाच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा बनवत असल्याचे जाफर यांना कळले. यानंतर जफर यांनी लगेच ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही सिनेमात पहेलवान हा कॉमन फॅक्टर असला तरी दोन्हींची कथा एकदम वेगळी आहे, हे निलेश यांनी सांगितले  तेव्हा कुठे जफर यांच्या जीवात जीव आला. 

Web Title: OMG! Salman's 'Sultan' was the name of 'Dangal'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.