OMG! राहुल खन्नाचा न्यूड सेल्फी बनला चर्चेचा विषय, फॅन्ससह सेलेब्सही झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:36 IST2020-02-07T17:36:00+5:302020-02-07T17:36:52+5:30
राहुल खन्नाच्या बोल्ड फोटोवर बॉलिवूडचे सेलेब्सही फिदा झाले आहेत.

OMG! राहुल खन्नाचा न्यूड सेल्फी बनला चर्चेचा विषय, फॅन्ससह सेलेब्सही झाले फिदा
बॉलिवूडचा अभिनेता राहुल खन्ना रुपेरी पडद्यावर झळकला नसला तरी तो सोशल मीडियावर सक्रीय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. राहुलने नुकताच त्याचा एक बाथरोब मधलाबोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. त्यात तर या न्यूड सेल्फीवर फॅन्ससोबत बॉलिवूडचे सेलेब्सही फिदा झाले आहेत.
राहुल खन्नाच्या या फोटोने मलायकालाच नाही तर करण जोहर आणि सिंकदर खेरचेही लक्ष वेधून घेतले आहे. राहुलने आरशासमोर हा सेल्फी काढला असून आरश्याच्या आड तो स्वत:ला लपवत असल्याचं पहायला मिळत आहे.
या फोटोवर मलायकाने राहुल या फोटोतून आरसाच फोडेल असे म्हटले आहे. तर व्हीजे अनुषा हिने राहुलचा फोटो बघून अनेकांनी मजेशीर कमेंटसही केल्या आहेत. करण जोहरने तर 'ओह' एवढेच लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मॉडेल म्हणून रँम्पवर गाजलेल्या राहुलने दीपा मेहता यांच्या '१९४७ अर्थ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर दिल कबड्डी, वेक अप सीड, लव आज कल, आणि फायर फ्लाईज या चित्रपटात त्याने काम केले आहे.