OMG!! ‘बाहुबली2’च्या रिलीजनंतर उडणार प्रभासच्या लग्नाचा बार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 11:44 IST2017-03-16T06:14:06+5:302017-03-16T11:44:06+5:30
‘बाहुबली2’च्या रिलीजनंतर ‘बाहुबली’ अर्थात अभिनेता प्रभास लग्न करणार आहे. होय, सध्या याचीच काय ती चर्चा आहे. निश्चितपणे ही बातमी ...

OMG!! ‘बाहुबली2’च्या रिलीजनंतर उडणार प्रभासच्या लग्नाचा बार?
‘ ाहुबली2’च्या रिलीजनंतर ‘बाहुबली’ अर्थात अभिनेता प्रभास लग्न करणार आहे. होय, सध्या याचीच काय ती चर्चा आहे. निश्चितपणे ही बातमी प्रभाववर ‘फिदा’ असलेल्या मुलींना निराश करणारी बातमी आहे. दिलासा केवळ इतकाच की, अद्याप खुद्द प्रभासने या बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सध्या तरी ही नुसती चर्चा आहे.
आधी फक्त तेलुगू सिनेमांपुरती मर्यादित ओळख असलेला प्रभास ‘बाहुबली’च्या भूमिकेमुळे बॉलिवूडसह जगभरात पोहोचला. त्याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढली. येत्या एप्रिलमध्ये प्रभासचा ‘बाहुबली2’ येतोय. हा चित्रपट रिलीज होताच, प्रभास लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा आहे. प्रभासने स्वत:साठी वधू निवडली असून लग्नाची तारीखही जवळपास ठरलेली असल्याचे मानले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रभासचे कुटुंबीय या बातमीची घोषणा करण्यास आतूर आहेत. त्यांना केवळ एका योग्य क्षणाची प्रतीक्षा आहे. ही बातमी खरी ठरली तर निश्चितपणे प्रभासच्या चाहत्यांपेक्षा आनंद दुसºया कुणाला होणार? प्रभासची होणारी वधू कोण, कुठली? हे अद्याप कळू शकलेले नाही. खुद्द प्रभासने आपल्या भावी वधूबाबत सांगावे, असे आम्हाला वाटतेय. होय ना?
ALSO READ : बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटात दिसला होता ‘बाहुबली’ प्रभास!
प्रभास बनणार ‘प्रभू राम’?
आज सकाळी बहुप्रतीक्षित ‘बाहुबली2’चा ट्रेलर आऊट झाला. या ट्रेलरवर लोकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. अगदी काही तासांत लाखो लोकांनी हा ट्रेलर बघितला. हा ट्रेलर बघितल्यानंतर ‘बाहुबली2’ हा ‘बाहुबली’वरही भारी पडणार, असे वाटतेय.‘बाहुबली’दुसºया भागात अधिक भन्नाट आणि थरारक दृश्ये साकारली गेली आहे. कटप्पावर बाहुबलीचा असणारा विश्वास आणि या दोघांच्याही नात्याचे वेगळेपण ट्रेलरमधील एका दृश्यात पाहायला मिळत आहे.अनुष्का शेट्टीचा लूकही सर्वांचे लक्ष वेधत आहे. ‘बाहुबली २’मध्ये प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, सत्यराज, राम्या कृष्णन हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत.