​OMG! अक्षय कुमारसोबत लग्न करण्याआधी ट्विंकल खन्नाचा झाला होता दोनदा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 17:17 IST2016-12-29T17:17:48+5:302016-12-29T17:17:48+5:30

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे आज बॉलिवुडमधील एक क्युट कपल मानले जाते. खिलाडी कुमारच्या यशात आज ट्विंकलचा सिंहाचा ...

OMG! Before marrying Akshay Kumar, Twinkle Khanna was married twice before she got married | ​OMG! अक्षय कुमारसोबत लग्न करण्याआधी ट्विंकल खन्नाचा झाला होता दोनदा साखरपुडा

​OMG! अक्षय कुमारसोबत लग्न करण्याआधी ट्विंकल खन्नाचा झाला होता दोनदा साखरपुडा

्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे आज बॉलिवुडमधील एक क्युट कपल मानले जाते. खिलाडी कुमारच्या यशात आज ट्विंकलचा सिंहाचा वाटा आहे. ट्विंकलने एक अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला केव्हाच रामराम ठोकला आहे. पण एक लेखिका म्हणून तिने आज तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. आज घर आणि करियर या दोन्ही गोष्टी ती खूपच चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. 
ट्विंकल आणि अक्षयचा आज सुखी संसार सुरू असला तरी अक्षयसोबत लग्न करण्याआधी ट्विंकलचा दोनदा साखरपुडा झाला होता ही गोष्ट खूपच कमी जणांना माहिती आहे. ट्विंकलचा साखरपुडा कोणासोबत झाला होता हे तुम्हाला कळले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ट्विंकलचा साखरपुडा दुसऱ्या कोणासोबत नव्हे तर अक्षय कुमारसोबतच झाला होता. 
अक्षय आणि ट्विंकल यांनी लग्न करण्याआधी कित्येक महिने ते एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या नात्याला अक्षय आणि ट्विंकल दोघांच्याही घरातून लगेचच संमती मिळाली आणि त्या दोघांचा साखरपुडा करण्यात आला. पण साखरपुडा झाल्यानंतर काहीच दिवसांत त्या दोघांमध्ये बिनसले आणि हा साखरपुडा मोडला. 
ट्विंकलचे अक्षयवर खूप प्रेम असल्याने साखरपुडा मोडल्यानंतर ती खूपच दुःखी झाली होती. पण काहीच दिवसांत या दोघांमध्ये सगळे काही सुरळीत झाले आणि त्या दोघांनी पुन्हा एकदा साखरपुडा केला. त्यामुळे ट्विंकलचा एकदा नव्हे तर तब्बल दोनदा साखरपुडा झाला आहे. 
2001मध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी लग्न केले.  

Web Title: OMG! Before marrying Akshay Kumar, Twinkle Khanna was married twice before she got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.