OMG : कॅटरिना कैफची बहिण इसाबेलच्या डेब्यू चित्रपटातून सलमान खानने घेतली एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 12:24 IST2018-05-04T06:52:18+5:302018-05-04T12:24:03+5:30

सलमान खानने कॅटरिना कैफची बहिण इसाबेलचा डेब्यू चित्रपट 'टाईम टू डान्स'मधून एक्झिट घेतली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटात इसाबेल आणि सूरज ...

OMG: Katrina Kaif's sister Salman Khan took exit from Isabella's debut film | OMG : कॅटरिना कैफची बहिण इसाबेलच्या डेब्यू चित्रपटातून सलमान खानने घेतली एक्झिट

OMG : कॅटरिना कैफची बहिण इसाबेलच्या डेब्यू चित्रपटातून सलमान खानने घेतली एक्झिट

मान खानने कॅटरिना कैफची बहिण इसाबेलचा डेब्यू चित्रपट 'टाईम टू डान्स'मधून एक्झिट घेतली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटात इसाबेल आणि सूरज पंचोली यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात सलमान खान कॅमियो करणार होता. 

मिड-डेच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट डान्सवर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटात इसाबेल आणि सूरज वाल्ट्ज आणि टेंगो स्टाईल डान्स करताना दिसणार आहेत मात्र या डान्सिंग स्टाईलमध्ये सलमान कम्फर्टेबल नव्हता. तसेच त्याला सध्या दबंग टूरवर फोकस करायचे आहे. यानंतर तो आपला आगामी चित्रपट 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. आपल्या बिझी शेड्यूलमुळे सलमान इसाबेलच्या चित्रपटाला वेळ देऊ शकला नसता कदाचित या कारणामुळेच त्यांने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला असावा. टाईम टू डान्स’ या चित्रपटात ‘ओ ओ जाने जाना...’ हे गाणे रिक्रिएट केले जाणार होते आणि या गाण्यात सलमानचा स्पेशल अपीअरन्स देणार होता. सलमान, इसाबेल आणि सूरज अशा तिघांवर हे गाणे चित्रीत केले जाणार होते. 

मीडिया रिपोर्टनुसार सलमान कॅटरिनाची बहिण इसाबेलच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन फारसा उत्सुक नव्हता. कॅटरिनाने सलमानला इसाबेलला दबंग टूरवर घेऊन जाण्यासाठी आग्रह केला होता मात्र सलमानने यासाठी स्पष्ट नकार दिला.  

ALSO READ :  मॅगझिनच्या कव्हरपेजवर ‘कैफ सिस्टर’चा जलवा! तुम्हीही पाहाच!!

‘टाईम टू डान्स’  या चित्रपटात इसाबेल ही सूरज पांचोलीसोबत रोमान्स करताना दिसेल. या चित्रपटात इसाबेल  बॉल रूम व लॅटिन डान्सरच्या भूमिकेत आहे तर सूरज एका स्ट्रीट डान्सरच्या रूपात. कोरिओग्राफी आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाचा सहाय्यक स्टेनली डिकोस्टा हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. अर्थात यात रेमोचाही सहभाग आहे. होय, या चित्रपटाची कथा रेमोने लिहिली आहे. पुढील महिन्यात ‘टाईम टू डान्स’चे शूटींग सुरू होईल.  

Web Title: OMG: Katrina Kaif's sister Salman Khan took exit from Isabella's debut film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.