OMG: कंगना करतीय डेट, लवकरच करणार लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 17:48 IST2017-02-15T12:18:05+5:302017-02-15T17:48:05+5:30
कंगना राणौत ही नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणाबाबत प्रसिद्ध आहे. नुकतीच तिने ‘टाईम्स आॅफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडस्बाबत बोलताना ...

OMG: कंगना करतीय डेट, लवकरच करणार लग्न!
क गना राणौत ही नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणाबाबत प्रसिद्ध आहे. नुकतीच तिने ‘टाईम्स आॅफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडस्बाबत बोलताना सांगितले की, ‘जे तिचे पूर्वीचे बॉयफ्रेंडस् आहेत, ते तिला परत भेटू इच्छितात. परंतु मी पाठीमागे कधीच वळून पाहत नाही. हे माझे एकप्रकारे रेकॉर्डच् आहे.’ आपण रिलेशनशीपमध्ये असून, लवकरच लग्न करणार असल्याचे तिने सांगितले.
कंगना म्हणाली की, ‘मी जेंव्हा रिलेशनशीपमध्ये असते, त्यावेळी मी ते खरोखरी निभावते. परंतु तेंव्हा जे संपते, मी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यांना जरी वाटत असले तरी मी त्यांना भेटत नाही.’
तिच्या अनुसार ‘मला रिलेशनशीप संपविण्यास एक आठवड्याचा कालावधी लागतो. गेल्या सात वर्षात असेच झाले आहे. मला असे वाटते की आयुष्य खूप मोठे आहे. मी रिलेशनशीपकडे अत्यंत सहजगत्या पाहते. कारण मी जेंव्हा रिलेशनशीपमध्ये असते, त्यावेळी पूर्णत: त्यात सामावलेली असते आणि जर ते काम करीत नसेल तर त्या ठिकाणी राहण्यात काहीही अर्थ नसल्याचे मला वाटते.’
तिच्या या यादीत आदित्य पांचोली, अध्ययन सुमन यांचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर हृतिक रोशनचा देखील तिने आपला पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड म्हणून जाहीर केले. हृतिकसोबत गेल्या वर्षी तिचा खूप वाद झाला होता, त्याशिवाय हे प्रकरण कोर्टातही गेले होते.
सध्या ती रंगून चित्रपटात काम करीत आहे. तिच्या मते या चित्रपटातील ज्युलिया असेच पात्र आहे. कंगना सध्या कुणासोबत डेट करीत आहे, हे तिने अद्याप जाहीर केले नाही. प्रेम हे अत्यंत शुद्ध भावना आहे, ज्यामुळे तुम्ही स्वत:ला ओळखता आणि मोकळे असता, असे तिचे म्हणणे आहे.