OMG! जान्हवी कपूरने नाकारला १५० कोटींचा चित्रपट??
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 19:48 IST2016-08-01T14:18:58+5:302016-08-01T19:48:58+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. सोशल ...

OMG! जान्हवी कपूरने नाकारला १५० कोटींचा चित्रपट??
प रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर ही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या जान्हवीला चित्रपटांच्या आॅफर्सही येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जान्हवी नक्की कोणत्या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार हे पाहणे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच औत्सुक्याचे असेल. पण अलीकडे जान्हवीने तब्बल १५० कोटींचा चित्रपट नाकारला असल्याची खबर आहे. होय,‘गजनी’ आणि ‘हॉलीडे’ सारख्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक ए आर मुरुगदास हे नवा तेलुगु चित्रपट काढण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटाचा बजेट तब्बल १५० कोटी असून यात दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार महेश बाबू हा मुख्य भूमिका साकारणार आहे. जान्हवीने या चित्रपटात काम करावे अशी मुरुगदास यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी बोनी कपूर आणि श्रीदेवीची भेट घेऊन त्यासाठी होकारही मिळवला होता. पण जेव्हा जान्हवीकडे याविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा तिने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. मुरुगदास यांनी तिचा नकार होकारात बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही.
![]()
आपण चित्रपटात काम करण्यासाठी सध्या तयार नसल्याचे सांगत जान्हवीने हा चित्रपट नाकारल्याचे कळते. तिला हिरोईन म्हणून करियर करायचे आहे मात्र यासाठी अजून वेळ आहे, असे तिचे म्हणणे आहे. सध्या जान्हवी लॉस एंजलिस येथील स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे. तेव्हा काही काळ प्रतीक्षा आलीच...!