OMG ! ​जॅकलिन फर्नांडिसने सलमान खानला म्हटले ‘NO’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 12:00 IST2017-04-20T06:30:40+5:302017-04-20T12:00:40+5:30

सलमान खानसोबतच्या ‘किक’ या चित्रपटानंतर जॅकलिन फर्नांडिस हिचे नशीब चांगलेच फळफळले होते.  ‘किक’ या चित्रपटानंतर तिची स्टार व्हॅल्यू एकदम ...

OMG! Jacqueline Fernandes told 'No' to Salman Khan! | OMG ! ​जॅकलिन फर्नांडिसने सलमान खानला म्हटले ‘NO’!

OMG ! ​जॅकलिन फर्नांडिसने सलमान खानला म्हटले ‘NO’!

मान खानसोबतच्या ‘किक’ या चित्रपटानंतर जॅकलिन फर्नांडिस हिचे नशीब चांगलेच फळफळले होते.  ‘किक’ या चित्रपटानंतर तिची स्टार व्हॅल्यू एकदम वाढली होती. हा चित्रपट खºया अर्थाने जॅकच्या करिअरमधील टर्निंग पॉर्इंट ठरला होता. पण आता म्हणाल तर जॅकलिनने सलमान खानसोबत चित्रपट करायला ‘ना’ केली आहे. होय, साक्षात सलमानला जॅकने ‘ना’ म्हटले आहे.
खरे तर सलमानच्या चित्रपटाला कुठलीही हिरोईन नकार देत नाही. जॅकलिन तर सलमानची चांगली मैत्रिणही आहे. याऊपरही तिने सलमानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटाला नकार दिला आहे. आता जॅकच्या या नकारामागचे कारण काय तर डेट्स. होय, जॅकलिन सध्या इतकी बिझी आहे की, तिच्याकडे अजिबात डेट्स नाहीत. त्यामुळे मनाविरूद्ध तिला सलमानच्या चित्रपटाला नकार द्यावा लागला. सलमानचा ‘जुगलबंदी’ हा चित्रपट लवकरच फ्लोरवर येणार आहे. या चित्रपटात जॅक असावी, अशी सलमानची इच्छा होती. पण जॅकलिनने आधीच अनेक चित्रपट साईन केले आहेत. करण जोहरच्या ‘ड्राईव’मध्ये जॅकलिन सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

ALSO READ : सुशांतसिंह राजपूत व जॅकलिन फर्नांडिस का आलेत एकत्र?

या चित्रपटाचे शूटींगही सुरु झाले आहे. यानंतर ‘जुडवा2’ या चित्रपटातही जॅकलिन आहे. या सिनेमात जॅकलिन वरूण धवन व तापसी पन्नू यांच्यासोबत दिसेल. या चित्रपटाच्या शूटींगसाठी जॅकलिन लकवरच न्यूयॉर्कला रवाना होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात ती सप्टेंबरपर्यंत बिझी आहे. याशिवाय ‘रिलोड’ या चित्रपटातही जॅकलिन सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर अलीकडे जारी करण्यात आले होते. गतवर्षी जॅकलिनचे ‘फ्लाईंग जट’ आणि ‘ढिशूम’ या दोन चित्रपटांत दिसली होती.

Web Title: OMG! Jacqueline Fernandes told 'No' to Salman Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.