OMG!! ​ ‘सरकार’सीरिजमध्ये अमिताभ यांच्याऐवजी अभिनेते जितेन्द्र असते तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2017 17:27 IST2017-03-02T09:43:03+5:302017-03-02T17:27:16+5:30

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘सरकार’चा तिसरा भाग घेऊन येत आहेत. या ‘सरकार3’मध्येही दिसणार आहेत ते, मेगास्टार अमिताभ बच्चन हेच. ...

OMG !! If Amitabh was an actor instead of Amitabh Bachchan in 'Government' series? | OMG!! ​ ‘सरकार’सीरिजमध्ये अमिताभ यांच्याऐवजी अभिनेते जितेन्द्र असते तर?

OMG!! ​ ‘सरकार’सीरिजमध्ये अमिताभ यांच्याऐवजी अभिनेते जितेन्द्र असते तर?

ग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘सरकार’चा तिसरा भाग घेऊन येत आहेत. या ‘सरकार3’मध्येही दिसणार आहेत ते, मेगास्टार अमिताभ बच्चन हेच. पण विचार करा, ‘सरकार’सीरिजमध्ये अमिताभ यांच्याऐवजी अभिनेते जितेन्द्र असते तर? तर काय? खुद्द राम गोपाल वर्मा यांनीच याचे उत्तर दिले आहे. होय, ‘सरकार’ सीरिजमध्ये अमिताभ यांच्याऐवजी जितेन्द्र असते तर चित्रपट चाललाच नसता, असे राम गोपाल वर्मा बेधडकपणे बोलून गेले.



मुंबईत ‘सरकार3’च्या ट्रेलर लॉन्चप्रकरणी राम गोपाल वर्मा यांनी अमिताभ यांची जोरदार प्रशंसा केली. पण ही प्रशंसा करताना जे बोलायचे नाही ते सुद्धा ते बोलून गेलेत. काही चित्रपटांच्या भूमिकांसाठी अभिनेत्यांची नावे आधीच ठरलेली असतात. जणू त्या भूमिका त्यांच्यासाठीच बनलेल्या असतात. अमिताभ यांच्या ‘विजय’ नामक व्यक्तिरेखेने मला बरेच प्रभावित व प्रेरित केले आहे. ‘जंजीर’नंतर ८० च्या दशकात अमिताभ यांनी केलेल्या भूमिका लाजवाब होत्या. त्यामुळेच ‘सरकार’साठी मी सर्वप्रथम त्यांच्याकडेच गेलो, असे राम गोपाल वर्मा म्हणाले. यावर अमिताभही बोलून गेले. लेखक आणि दिग्दर्शक मला जे करायला सांगतात, तेच मी कॅमेºयापुढे करतो. तेच सगळे ठरवतात, मी फक्त त्यांच्या आदेशाचे पालन करतो, असे अमिताभ म्हणाले. पण राम गोपाल यांनी लगेच अमिताभ यांचे हे शब्द खोडून काढले. मी अमिताभ यांच्या या मताशी अजिबात सहमत नाही. समजा ‘सरकार’च्या त्याच लाईटिंग आणि सेटवर मी जितेन्द्र यांना उभे केले आणि त्यांना तेच डॉगलॉग्स व सीन्स दिले तर चित्रपट चालणारच नाही. कारण माझ्या मते, अभिनेता हाच भूमिकेत प्राण ओततो, असे राम गोपाल वर्मा एका सूरात बोलून गेले. राम गोपाल वर्मा यांचे हे वाक्य ऐकून उपस्थितच नाही तर अमिताभ यांनाही धक्का बसला. मग काय त्यांनी लगेच हे राम गोपाल वर्मा यांचे व्यक्तिगत मत आहे, असे सांगून पुढचा प्रश्न मागवला.

खरे तर  राम गोपाल वर्मा जितेन्द्र यांच्याबद्दल जे काही बोलले ते गमती गमतीत बोलून गेले. पण त्यांचा हा ‘शेरा’ जितेन्द्र यांच्या जिव्हारी न लागो म्हणजे मिळवले.

 

Web Title: OMG !! If Amitabh was an actor instead of Amitabh Bachchan in 'Government' series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.