OMG! ‘मिर्झिया’मुळे हर्षवर्धनला कर्णदोष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 14:49 IST2016-09-30T09:19:14+5:302016-09-30T14:49:14+5:30
राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’द्वारे हर्षवर्धन कपूर बॉलिवूड डेब्यू करतो आहे. मर्झिया- साहिबा यांची प्रेमकथा ‘मिर्झिया’ या सिनेमात दिसणार ...
.jpg)
OMG! ‘मिर्झिया’मुळे हर्षवर्धनला कर्णदोष?
र केश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’द्वारे हर्षवर्धन कपूर बॉलिवूड डेब्यू करतो आहे. मर्झिया- साहिबा यांची प्रेमकथा ‘मिर्झिया’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटासाठी हर्षवर्धनने प्रचंड मेहनत केलीय. यात तो पहिल्यांदा मोटर सायकल चालवताना, घोडेस्वारी करताना दिसणार आहे. केवळ एवढेच नाही तर हर्षवर्धनने यात काही चित्तथराथर स्टंटही केल्याचे कळतेय. यापैकीच काही स्टंट करताना हर्षवर्धनच्या कानाला दुखापत झाल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सिक्वेंस शूट करताना हर्षवर्धनच्या कानाच्या पडद्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे हर्षवर्धनला ऐकायला त्रास होत असल्याचे कळते. सध्या हर्षवर्धन यासाठी उपचार घेतोय. तेव्हा तूर्तास तरी हर्षवर्धन यातून बरा व्हावा, एवढीच कामना करू यात.