OMG!! ​परिणीतीला लग्नाआधी हवे बाळ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 18:05 IST2016-04-29T12:35:53+5:302016-04-29T18:05:53+5:30

होय, ऐकता ते खरे आहे. हॉट अ‍ॅण्ड सेक्सी परिणीती चोपडाला लग्नाआधी मुलं हवे आहे. अर्थात तिला हे मुलं दत्तक ...

OMG !! Baby before the wedding | OMG!! ​परिणीतीला लग्नाआधी हवे बाळ!!

OMG!! ​परिणीतीला लग्नाआधी हवे बाळ!!

य, ऐकता ते खरे आहे. हॉट अ‍ॅण्ड सेक्सी परिणीती चोपडाला लग्नाआधी मुलं हवे आहे. अर्थात तिला हे मुलं दत्तक घ्यायचे आहे. माझे लग्न केव्हा होईल, ठाऊक नाही. मात्र लग्नाआधी एक मुलं दत्तक घेण्याची माझी इच्छा आहे, असे परिणीतीने अलीकडे सांगितले. माझी आई रिना चोपडा आणि डॅड पवन चोपडा दोघेही एका संस्थेच्या माध्यमातून २०० पेक्षा अधिक मुलांची देखरेख करीत आहेत. माझ्या आईपासून प्रेरणा घेत, मला एक मुलं दत्तक घ्यायचे आहे, असेही परी म्हणाली. एखादा हसरा, सुस्वभावी मुलगा मिळालाच तर मी कधीही लग्न करेल. माझी बहीण प्रियंका ३२ वर्षांची आहे. तिने अद्यापही लग्न केलेले नाही. पण मी २७ वर्षांचे झाले आहे. मनासारखा मुलगा मिळालाच तर ‘चट मंगनी पट ब्याह’ करायला मी जराही मागेपुढे पाहणार नाही,असेही ती म्हणाली.

Web Title: OMG !! Baby before the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.