OMG!! ​अर्जुन रामपाल संतापला, फोटोग्राफर्सचे फोडले डोके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 10:52 IST2017-04-09T05:22:43+5:302017-04-09T10:52:43+5:30

अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलात एका फोटोग्राफरला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात ...

OMG !! Arjun Rampal Santapala, photographed head of the police! | OMG!! ​अर्जुन रामपाल संतापला, फोटोग्राफर्सचे फोडले डोके!

OMG!! ​अर्जुन रामपाल संतापला, फोटोग्राफर्सचे फोडले डोके!

िनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलात एका फोटोग्राफरला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. संबंधित फोटोग्राफर्सने अर्जुनविरूद्ध दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.



पीडित फोटोग्राफर शोभीत यांनी सांगितले की, एका पंचतारांकित हॉटेलात मी अर्जुनचे काही फोटो घेतले. त्यामुळे तो इतका संतापला की, त्याने माझा कॅमेरा हिसकावून दूर फेकून दिला. शिवाय मला मारहाण केली. रविवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली. अर्जुन असा का वागला, मला ठाऊक नाही. 
या घटनेत शोभीत जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर मोठी जखम झाली आहे. याप्रकरणी पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोपही शोभीतने केला आहे.
दरम्यान पोलिसांनी हा आरोप धुडकावून लावला आहे. या घटनेचे फुटेज आमच्याकडे आहे आणि कारवाई सुरु आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.अभिनेता, निर्माता, मॉडेल, टीव्ही अँकर अशी ओळख असलेल्या अर्जुनने सन २००१ मध्ये ‘प्यार इश्क और मोहब्बत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात त्याने मॉडेलचीच भूमिका सााकरली होती. लवकरच अर्जुन ‘डॅडी’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तो  अरूण गवळीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. मध्यंतरी अर्जुन रामपाल आणि हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान या दोघांच्या रिलेशनशिपचा अध्याय गाजला होता. अर्जुन हाच हृतिक व सुजैनच्या नात्यातील व्हीलन ठरला, अशी चर्चा रंगली होती. सुजैनसाठी अर्जुन आपल्या पत्नीला घटस्फोट देणार, अशा वावड्याही उठल्या होत्या. अर्थात अर्जुनने याचा इन्कार केला होता.

Web Title: OMG !! Arjun Rampal Santapala, photographed head of the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.