OMG !! अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी2’ विरूद्ध वकील गेला कोर्टात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 12:52 IST2017-01-23T07:16:19+5:302017-01-23T12:52:04+5:30
अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी2’ रिलीज व्हायच्याच आधी, पुन्हा एकदा वादात सापडला आहे. होय, मुंबईच्या एका वकिलाने या चित्रपटाच्या शीर्षकावर ...

OMG !! अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी2’ विरूद्ध वकील गेला कोर्टात!
अ ्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी2’ रिलीज व्हायच्याच आधी, पुन्हा एकदा वादात सापडला आहे. होय, मुंबईच्या एका वकिलाने या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला आहे. अजय कुमार एस. वाघमारे असे या वकीलाचे नाव आहे. हायकोर्टात वकील असलेल्या वाघमारे यांनी या शीार्षकाविरूद्ध याचिका दाखल केली आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमाच्या नावातून ‘एलएलबी’ हा शब्द हटविण्यात यावा, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. चित्रपटाच्या शीर्षकातील ‘एलएलबी’ हा शब्द वकील पेशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा आहे. या चित्रपटातील एका गाण्यात अक्षय कुमार न्यायालयाबाहेर नाचतांना दिसतोय. यावरून त्याच्या मनात वकीली पेशाबद्दल जराही आदर नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर आणि प्रोमो सोशल साईट्सवरून हटविण्यात यावेत, असे या वकीलाने आपल्या याचिकेत म्हटले आहे. चित्रपटात जाणीवपूर्वक वकीलांची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न केले गेले असल्याचा दावाही या वकीलाने केला आहे. या याचिकेवर येत्या २४ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
यापूर्वीही अक्षय कुमारसह सहा लोकांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आले होते. बाटा या फुटवेअर मॅन्यूफॅक्चरर कंपनीने चित्रपटाच्या टीमवर मानहानीचा आरोप ठवेला होता. या संवादात बाटाच्या चपलांना निकृष्ठ दर्जाचे उत्पादन असे संबोधून कंपनीची थट्टा करण्यात आली आहे. यामुळे आमच्या ब्रँडची प्रतिमा मलीन झाली असल्याचा आरोप कंपनीने केला होता. सोबत बाटा या कं पनीला आर्थिक नुकसान पोहचविण्याचा आरोपही लावण्यात आला होता. बाटाने सुद्धा चित्रपट आणि चित्रपटाच्या ट्रेलरमधून हा संवाद तात्काळ हटविण्याची मागणी केली होती.
Also read : ‘जॉली एलएलबी २’ : अक्षय कुमारसह सहा जणांना कायदेशीर नोटीस
‘जॉली एलएलबी २’ आणि ‘जॉली एलएलबी’मध्ये आहेत ‘या’ काही कॉमन गोष्टी...!
फेबु्रवारी महिन्यात ‘जॉली एलएलबी2’ हा सिनेमा रिलीज होत आहे. अक्षय कुमारने यात वकीलाची भूमिका साकारली आहे. सुभाष कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोब हुमा कुरैशी लीड रोलमध्ये आहे.