OMG : आमीर-किरणनंतर आता ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला स्वाइन फ्लूची लागण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 13:46 IST2017-08-09T08:16:39+5:302017-08-09T13:46:39+5:30

देशभरात झपाट्याने पसरत असलेल्या ‘स्वाइन फ्लू’ या भयानक आजाराने बॉलिवूडमध्येही थैमान घातल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा मिस्टर ...

OMG: After 'Amir-ray', this 'Bollywood' actress has swine flu infection! | OMG : आमीर-किरणनंतर आता ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला स्वाइन फ्लूची लागण!

OMG : आमीर-किरणनंतर आता ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला स्वाइन फ्लूची लागण!

शभरात झपाट्याने पसरत असलेल्या ‘स्वाइन फ्लू’ या भयानक आजाराने बॉलिवूडमध्येही थैमान घातल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर आता अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिलादेखील स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे याच्या पत्नीलाही स्वाइन फ्लू झाल्याचे समोर आले होते. 

एका वृत्तपत्राशी बोलताना ऋचानेच याबाबतचा खुलासा केला आहे. ऋचाने म्हटले की, ‘अमेरिकेतून परतल्यानंतर मला या भयानक आजाराचे लक्षण दिसून आले. जेव्हा मी याबाबतच्या काही टेस्ट केल्या, तेव्हा मी एच१ एन१ व्हायरसने पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. लगेचच उपचार केल्यानंतर मला आता काहीसे बरे वाटत आहे. त्यामुळे आता मी माझ्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यास सज्ज आहे. त्याचबरोबर मी पूर्णपणे प्रीकॉशनही घेणार आहे. त्यासाठी मी माझ्या डॉक्टरची परवानगी घेतली असून, मी आता ‘फुकरे टीम’ ज्वाइन केली आहे.  



सध्या ऋचा तिच्या ‘फुकरे रिटर्न्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ऋचाचा हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या ‘फुकरे’चा सीक्वल आहे. चित्रपटात पुलकित सम्राट, अली फजल, मंजोत सिंग आणि वरुण शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘फुकरे’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. यामध्ये ऋचा दमदार भूमिकेत बघावयास मिळाली होती. हा एक कॉमेडीपट आहे. 

दरम्यान, बॉलिवूड स्टार्स स्वाइन फ्लूच्या विळख्यात येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेविषयी प्रचंड काळजी घेतली जात असतानाही त्यांना अशाप्रकारच्या भयानक आजाराची लागण होत असल्याने त्यांनी स्वत:हून काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वास्तविक, बॉलिवूड स्टार्सना चित्रपटाच्या शूटिंग तथा प्रमोशननिमित्त लोकांमध्ये जावे लागत असल्याने किंवा विदेश दौरे करावे लागत असल्याने त्यांना या आजाराची लागण होत आहे. 

Web Title: OMG: After 'Amir-ray', this 'Bollywood' actress has swine flu infection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.