OMG! अदा शर्माला चाहत्याने सगळ्यांसमोर मागितला किस...मग झाले असे काही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 15:30 IST2017-12-05T10:00:30+5:302017-12-05T15:30:30+5:30

चाहत्यांच्या नको त्या हरकतींमुळे सेलिब्रिटी संतापल्याच्या बातम्या आपल्यासाठी नव्या नाहीत. काल-परवाच अभिनेत्री रिचा चड्ढा अशीच संतापली होती. काही अतिउत्साही ...

OMG! Ada Sharma asked the fans who asked everyone ... Then something happened! | OMG! अदा शर्माला चाहत्याने सगळ्यांसमोर मागितला किस...मग झाले असे काही!!

OMG! अदा शर्माला चाहत्याने सगळ्यांसमोर मागितला किस...मग झाले असे काही!!

हत्यांच्या नको त्या हरकतींमुळे सेलिब्रिटी संतापल्याच्या बातम्या आपल्यासाठी नव्या नाहीत. काल-परवाच अभिनेत्री रिचा चड्ढा अशीच संतापली होती. काही अतिउत्साही चाहत्यांनी तिच्या कारचा बाईकवरून पाठलाग केला होता. यानंतर रिचाने सोशल साईटवर या चाहत्यांना चांगलेच फटकारले होते. हीच वेळ अभिनेत्री अदा शर्मावरही आली. होय, अलीकडे एका मीडिया इव्हेंटमध्ये अदा शर्माला एका चाहत्यांच्या असभ्य वागणुकीमुळे अवघडलेल्या स्थितीचा सामना करावा लागला. अदाने सोशल मीडियावर याबाबतचा संताप व्यक्त केला आहे.

अलीकडे अदा या इव्हेंटला पोहोचली होती. इव्हेंट चांगला झाला. पण इव्हेंट संपल्यावर अदा जायला निघाली आणि एका चाहत्याने तिला गालावर चुंबन देण्याची मागणी केली. चाहत्याची ही मागणी अदाला चांगलीच खटकली. तिचा पारा चांगलाच चढला. पण परिस्थितीचे भान राखत   या चाहत्याना नम्रपणे नकार देत अदा तिथून निघाली. पण आपली मागणी पूर्ण न केल्याने हा चाहता मात्र दुखावला. यानंतर त्याने अदाला काही लोकांसोबत ट्रोल करणे सुरु केले. ‘कमांडो२’मध्ये तर तू लांबच लांब किस सीन्स दिले आहे. मग एका चाहत्याना एक किस देण्यात हरकत काय? इथपर्यंत या ट्रोलर्सची हिंमत गेली.



ALSO READ : अदाच्या ‘नॉटी अदा’!

मग मात्र अदाचा संयम सुटला. तिने एका पाठोपाठ एक असे अनेक टिष्ट्वट्स करत या ट्रोल करणाºयांना चांगलेच फैलावर घैतले. ‘गत तीन वर्षांत मी सोशल मीडियावर माझा राग काढला नाही. पण मी एक हार्मलेस किस न दिल्याने कुणाचा तरी अपमान झाल्याचा आरोप करून मला डिवचले गेलेय. मी मुलींना काही गोष्टी सांगू इच्छिते,’ इथून अदाने सुरुवात केली. पुढच्या टिष्ट्वटमध्ये तिने आपला संताप बोलून दाखवला. एखादा मुलगा मला पहिल्यांदा भेटून मला किस मागत असेल तर साहजिकच माझ्याकडून एक त्याला एक ठोसाच मिळणार. माझ्यापासून सांभाळून राहा,असे तिने लिहिले. मी चित्रपटात एक्स्पोज केले असले तरी याचा अर्थ हा नाही की, मी कुणाही सोबत शरिरसंबध ठेवेल, असेही तिने लिहिले आहे. अदाने ‘कमांडो2’बद्दलही लिहिले आहे. ‘कमांडो२ मध्ये भावना रेड्डीने पब्लिकमध्ये किस केले होते. हयातीने ‘हार्टअटॅक’मध्ये १ तास ४५ मिनिटे किस केला होता. पण मी ती नाही तर अदा शर्मा आहे,’ अशा शब्दांत तिने आपला संताप बोलून दाखवला आहे.

Web Title: OMG! Ada Sharma asked the fans who asked everyone ... Then something happened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.