OMG...! प्रिया प्रकाश वारियरच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 20:15 IST2019-02-07T20:15:00+5:302019-02-07T20:15:00+5:30
आपल्या नजरेने सर्वांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश वारियरचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला लोकांची खूप चांगली दाद मिळते आहे.

OMG...! प्रिया प्रकाश वारियरच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर खळबळ
आपल्या नजरेच्या कातील इशाऱ्याने एका रात्रीत प्रकाशझोतात येणारी प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा चित्रपट 'ओरु अडार लव'मधील 'फ्रीक पिल्ला' या गाण्याचे तेलगू व्हर्जन प्रदर्शित करण्यात आले आहे.हे गाणे सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ माजवत आहे. इतकेच नाही तर यातील तिच्या किसिंग सीनची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. या सीनमध्ये ती सहकलाकार रोशन अब्दुल राउफला किस करताना दिसते आहे.
'ओरु अडार' चित्रपटाच्या प्रदर्शनाला खूप अवधी आहे. मात्र या सिनेमातील फ्रीक पिल्ला हे गाणे युट्युबवर खूप ट्रेंड होत आहे. या गाण्याला आतापर्यंत १७ हजार लाइक्स मिळाले आहेत. या गाण्याचे मल्याळम व्हर्जन काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. या चित्रपटाचे बोल ऐकून खूप निगेटिव्ह कमेंट्स व डिसलाइक्स आले होते.
आता तेलगू व्हर्जन गाण्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे व मल्याळम गाण्यापेक्षा चांगले असल्याची प्रतिक्रिया मिळत आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन शान रहमान यांनी केले आहे. हा सिनेमा लवर्स डे या नावाने तेलगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. या रोमँटिक टीझरमध्ये ती किस करताना दिसते आहे.
प्रिया प्रकाश वारियर 'ओरु अडार लव'मधील एका गाण्यात आपल्या सहकलाकाराला डोळा मारताना दिसली होती आणि चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी तिचा हिंदी चित्रपट श्रीदेवी बंगलाचा टीझर प्रदर्शित झाला. जो पाहून तिचे चाहते नाराज झाले. या चित्रपटात ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची भूमिका साकारते आहे. या टीझरमधील एक सीन पाहून असे वाटते की श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये होतो. या चित्रपटाचा टीझर पाहून श्रीदेवीची आठवण येते. त्यामुळे हा सिनेमा वादात अडकला होता.